नवी दिल्ली, 25 डिसेंबर : देशभरात आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकारने एक देश एक आपत्कालीन क्रमांक 112 लाँच केला आहे. या क्रमांकाचा वापर 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातही 24 तास वापर करता येईल. आपत्कालीन क्रमांक 112 द्वारे तुम्ही फायर ब्रिगेड, मेडिकल आणि पोलिसांची ऑन द स्पॉट मदत घेऊ शकता. आपत्कालीन स्थितीत देशात आधीपासून 100 नंबर आहे. परंतु तरीही सरकारने 112 नंबर संपूर्ण देशभरात आपत्कालीन नंबर सुरू केला आहे. यामागे एक कारणंही देण्यात आलं आहे. संपूर्ण देशात विशेषत: यूएसए, कॅनडा आणि युरोपात आपत्कालीन सेवेसाठी 112 नंबर दिला जातो. त्यामुळे अधिकतर मोबाइलमध्ये 112 नंबर इमेरजेंसी कॉलसाठी फीड असतो. हेच पाहता TRAI ने 2015 मध्ये 112 नंबर इमेरजेंसी कॉलसाठी अधिकृत केला होता.
देशभरात कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात मोबाइल नेटवर्क येत नसेल तरीही 112 वर कॉल करुन इमेरजेंसी सर्विसद्वारे मदत मिळू शकते. 112 वर कॉल करणं पूर्णपणे मोफत आहे. मोबाइल फोनसह लँडलाइनवरुनही 112 वर कॉल करता येतो.
112 वर कॉल केल्यानंतर ऑन द स्पॉट फायर ब्रिगेड, मेडिकल आणि पोलिसांची मदत मिळू शकते. 112 क्रमांकावर ज्या राज्यातून कॉल केला त्या भाषेत बोलता येतं किंवा हिंदी आणि इंग्रजीतूनही मदत मागता येते.
1 एप्रिल 2017 नंतर विक्री होणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये पॅनिक बटणाची सुविधा दिली जात आहे. तुम्हालाही तुमच्या फोनमध्ये पॅनिक बटण अॅक्टिव्ह करायचं असल्यास, 3 वेळा पॉवर बटण दाबून 5 किंवा 9 नंबरचं बटण दाबून हे अॅक्टिव्ह करू शकता. त्यानंतर ज्यावेळी कधी 5 किंवा 9 नंबरचं बटण दाबून कॉल कराल, त्यावेळी आपोआप इमेरजेंसी नंबर 112 डायल होईल.