सावधान! या दिवाळीला इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करताय? मग ही बातमी वाचाच
मुंबई, 13 ऑक्टोबर: इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता ओला इलेक्ट्रिक नेहमीच चर्चेत राहते, कधी तिच्यातील सकारात्मक गोष्टींमुळे तर कधी तिच्यातील त्रुटींमुळे ओला स्कूटरची चर्चा होत असते. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्यानंतर अनेकांनी ती बुक केली होती, पण नंतर आग आणि सॉफ्टवेअरच्या समस्यांमुळे कंपनीला खूप टीकेला सामोरं जावं लागलं आहे. आता पुन्हा एकदा उत्पादनाच्या गुणवत्तेवर कंपनीवर प्रश्न उपस्थित केलं जात आहेत. आता ओला स्कूटर बाबतीत आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. एका ग्राहकानं सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की काही दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या Ola S1 Pro स्कूटरचे फ्रंट सस्पेंशन तुटले आहे. तसेच इतर अनेक ग्राहकांनीही या स्कूटरच्या सस्पेन्शनच्या तक्रारी केल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? ही घटना S1 Pro च्या संजीव जैन नावाच्या ग्राहकाने ओला इलेक्ट्रिक पब्लिक ग्रुप या फेसबुक ग्रुपमध्ये शेअर केली आहे. संजीव यांनी सांगितलं की, त्यांनी 6 दिवसांपूर्वी ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती आणि या स्कूटरचे फ्रंट सस्पेन्शन तुटलेलं आहे, या पोस्टसोबत त्याने एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यामध्ये S1 प्रो चे फ्रंट सस्पेन्शन पूर्णपणे तुटलेलं आहे. हेही वाचा: Home buying Tips: घर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी तपासा, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ काय म्हणाले संजीव? संजीव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कॉलनीत स्कूटर चालवत असताना ही घटना घडली. शेअर केलेल्या छायाचित्रात अपघाताचे कोणतेही संकेत नाहीत. चित्रात स्कूटर एकदम नवीन दिसते.
या स्कूटरची किंमत काय आहे? ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.39 लाख रुपये आहे. आसाममधील एका व्यक्तीने S1 Pro खरेदी केली होती. त्याच्या दाव्यानुसार स्कूटरमधील खराबीमुळं त्याचा मुलगा जखमी झाला आहे. परंतु कंपनीनं हा दावा फेटाळला असून कंपनीच्या म्हणण्यानुसार स्कूटरचा वेग खूप जास्त होता, असं सांगण्यात आलंय.