नवी दिल्ली, 6 मार्च : कोरोना काळात लॉकडाउनमुळे अनेकांना आपल्या नातेवाईकांना, मित्रांना प्रत्यक्ष भेटता आलं नसलं, तरी सोशल मीडिया ऑनलाईन माध्यमातून अनेक जण एकमेकांशी कनेक्ट होते. नेटफ्लिक्सनेही (Netflix) आता मित्रांसोबत व्हर्च्युअली एकत्र मूव्ही, वेब सीरीज पाहण्यासाठी एक सुविधा दिली आहे. याद्वारे युजर्स आपल्या मित्रांसोबत एकत्र नेटफ्लिक्सवर सीरीज किंवा मूव्हीचा आनंद घेऊ शकतील, तेही मोफत. जर तुम्ही गुगलचं क्रोम ब्राउजर वापरत असाल, तर तुम्हाला एक एक्सटेंशन डाउनलोड करावं लागेल. ‘Netflix Party’ असं त्याचं नाव आहे. याद्वारे युजर्स कोणत्याही मूव्ही किंवा सीरीजला प्ले, पॉज किंवा स्टॉप करू शकतात, जेणेकरून युजर्स त्याचवेळी मूव्ही पाहू शकतील, ज्यावेळी दूरचे मित्रही मूव्ही पाहत आहेत. एवढंच नाही, तर यात चॅट करण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे दूर राहूनही तुम्ही एकत्र मूव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
कसं वापराल हे एक्सटेंशन - - सर्वात आधी एकत्र मूव्ही पाहण्यासाठी युजरच्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन असणं आवश्यक आहे. - त्यानंतर netflixparty.com वर जावं लागेल. त्यानंतर ‘Get Netflix Party for free’ वर क्लिक करावं लागेल. - आता युजर गुगल क्रोमच्या वेब स्टोर पेजवर रिडायरेक्ट होईल आणि येथे ‘Add To Chrome‘ वर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर समोर एक पॉप-अप बॉक्स येईल आणि येथे Add Extension सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर ब्राउजरच्या टूलबारमध्ये ग्रे कलरचा NP लिहिलेला एक आयकॉन दिसेल.
- आता गुगल क्रोमवरून नेटफ्लिक्समध्ये लॉगइन करावं लागेल आणि मूव्ही किंवा सीरीज सिलेक्ट करावी लागेल. NP आयकॉन जो आधी ग्रे कलरचा होता, तो आता लाल रंगाचा झालेला असेल. - तिथे क्लिक करून Start the Party सिलेक्ट करावं लागेल. यामुळे युजर या मूव्ही पार्टीचा होस्ट बनेल आणि त्या होस्टशिवाय कोणीही त्याला पॉज, स्टॉप किंवा प्ले करू शकत नाही. - आता यूआरएल (URL)सिलेक्ट करावा लागेल आणि तो मित्रांना पाठवावा लागेल, ज्यांना तुम्ही इन्वाइट करू इच्छिता. - उजव्या बाजूला चॅट बॉक्स दिसेल, ज्यावर एखाद्या मित्राने जॉईन केल्यास ते दाखवलं जाईल. अशाप्रकारे आपल्या मित्रांसोबत दूर असूनही एकत्र मूव्ही पाहता येणार आहे.