JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता 28 नाही 30 दिवसांचा असेल Mobile Recharge, ग्राहकांच्या तक्रारीनंतर TRAI चे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

आता 28 नाही 30 दिवसांचा असेल Mobile Recharge, ग्राहकांच्या तक्रारीनंतर TRAI चे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना असे आदेश दिले आहेत, की कंपन्यांना कमीत-कमी एक रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) असा ठेवावा लागेल ज्याची वॅलिडीट संपूर्ण महिना असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 एप्रिल : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI ने टेलिकॉम कंपन्यांवर मोठी अॅक्शन घेतली आहे. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना असे आदेश दिले आहेत, की कंपन्यांना कमीत-कमी एक रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) असा ठेवावा लागेल ज्याची वॅलिडीट संपूर्ण महिना असेल. म्हणजेच आता सध्याचे रिचार्ज प्लॅन हे 28 दिवस, 24 दिवस असे आहेत. ते 28 दिवस न ठेवता संपूर्ण 30 किंवा 31 दिवस ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. टेलिकॉम कंपन्यांना यासाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Companies) कमीत-कमी एक प्लॅन, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक स्पेशल रिचार्ज प्लॅन संपूर्ण महिन्याभराच्या वॅलिडिटीसह असावा. जर 31 तारीख पुढील महिन्यात येत नसेल तर पुढील महिन्याची शेवटच्या तारीखेला रिचार्ज करावा लागेल. कंपन्यांना या बदलांसाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून 1 जून 2022 पासून संपूर्ण एका महिन्याचा रिचार्ज प्लॅन आवश्यक असणार आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावाने केवळ 28 दिवस चालणारा रिचार्ज देतात. याबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. एक महिना सांगून 28 दिवसांचा रिचार्ज दिला जातो. कंपन्या संपूर्ण 30 दिवसांचा वॅलिडिटी असणारा टॅरिफ प्लॅन देत नाही. परंतु आता यात बदल होतील. यासाठी TRAI ने सर्व कंपन्यांना आदेश दिले आहेत. नियमांत सुधारणा लागू झाल्यानंतर ग्राहकांना योग्य ती वॅलिडिटी आणि कालावधीचे प्लॅन निवडण्यासाठी अधिक पर्याय असतील असं टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितलं. ग्राहकांच्या याच तक्रारींनंतर TRAI ने कठोर भूमिका घेतली आहे.

हे वाचा -  फ्रीज, इयरबड्स, हेडफोन, कार आजपासून महागणार; स्मार्टवॉच, स्मार्टफोन होणार स्वस्त

28 दिवसांच्या वॅलिडिटीबाबत तक्रारी - TRAI ने रिचार्जबाबत निर्देश दिले आहेत. जो प्लॅन असेल, तो त्याच तारखेला पुन्हा रिचार्ज होईल याची काळजी घ्यावी, जेणेकरुन ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये. TRAI कडे याबाबत ग्राहकांकडून सतत तक्रारी येत होत्या. ग्राहकांच्या मते कंपन्या, टॅरिफची वैधता अर्थात वॅलिडिटी कमी करत आहेत. ही वॅलिडिटी एका संपूर्ण महिन्याऐवजी 28 दिवस करत आहेत. त्यावर TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना हे निर्देश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या