आधारचा गैरवापर न होण्यासाठी बायोमेट्रिक लॉक करता येतं. www.uidai.gov.in किंवा mAadhaar वर बायोमेट्रिक लॉक करता येईल.
नवी दिल्ली, 12 मार्च : आधार कार्ड देशातील प्रत्येक नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र आहे. आधार कार्डमध्ये नाव, लिंग, पत्ता यांसारखे डिटेल्स असण्यासह प्रत्येकाच्या बायोमेट्रिक्सचा डेटाही असतो. आधार डेटा कोणत्याही प्रकारच्या दुरुपयोगापासून वाचवण्यासाठी सरकारी एजेन्सी UIDAI युजर्सला आपलं आधार बायोमेट्रिक्स ऑनलाईन लॉक करण्याची सुविधा देतं. युजर्स आपल्या आधार कार्डच्या बायोमेट्रिक्स डेटाला ऑनलाईन UIDAI च्या वेबसाईट आणि mAadhaar App द्वारे लॉक आणि अनलॉक करु शकतात. सरकारी एजेन्सी UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधार बायोमेट्रिक्स लॉक केल्यानंतर कोणीही तुमच्या डेटाचा वापर करत, तुमच्या आयडेंटिटीला ऑथेंटिक करू शकत नाही. आधार बायोमेट्रिक्स लॉक आणि अनलॉक करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. ऑनलाईन असा लॉक करा तुमचा आधार बायोमेट्रिक्स डेटा - - सर्वात आधी सरकारी एजेन्सी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा. - वेबसाईटच्या होम पेजवर My Aadhaar सिलेक्ट करा. - आता आधार सर्विसेजवर (Aadhaar Services) लॉक/ अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा. यानंतर नवीन पेज ओपन होईल, तेथे बॉक्सवर टिक करा. - नव्या स्क्रिनवर तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर आणि Captcha कोड टाकावा लागेल. - त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाकून सबमिट करा. - आता नव्या पेजवर इनेबल लॉकिंग फीचरवर क्लिक करा. जसं यावर क्लिक कराल, तसं तुमचं बायोमेट्रिक लॉक होईल. बायोमेट्रिक्स लॉक झाल्यानंतर ऑथेंटिकेशनसाठी कोणीही याचा वापर करू शकत नाही. जर तुम्हाला ऑथेंटिकेशनसाठी तुमच्या बायोमेट्रिक्सची गरज पडल्यास, तुम्ही कधीही ते अनलॉक करू शकता. असं अनलॉक करा आधार बायोमेट्रिक्स डेटा - - सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in वर क्लिक करा. - होम पेजवर My Aadhaar सिलेक्ट करा. त्यानंतर आधार सर्विसेजमध्ये लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा. - नवीन पेज ओपन होईल. तेथे बॉक्सवर टिक करा. - नव्या स्क्रिनवर 12 अंकी आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. - संपूर्ण डिटेल्स टाकल्यानंतर Send OTP वर क्लिक करा. - रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. ओटीपी टाकून सबमिट करावं लागेल. - आता नव्या पेजवर Unlock बायोमेट्रिक्सवर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतरच तुमचं आधार बायोमेट्रिक्स 10 मिनिटांसाठी अनलॉक होईल. बायोमेट्रिक्स लॉक झाल्याची तारिख आणि वेळ तुमच्या स्क्रिनवर येईल. त्यानंतर पुन्हा तुमचं बायोमेट्रिक्स आपोआप लॉक होईल.