नवी दिल्ली, 22 डिसेंबर : जर तुम्ही ड्रायव्हिंग (Driving) करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता ड्रायव्हिंग करताना जर तुम्ही अपघाती भागात (Accidental Area) गेलात, तर तुमच्या फोनवर याबाबत अलर्ट केलं जाईल. अपघाती भागाबाबत ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट तुमच्या फोनवर दिला जाईल. यासाठी MapmyIndia चं Move App डाउनलोड करावं लागेल.
काय आहे Move App? हे App मागील आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लाँच केलं होतं. MapmyIndia ने IIT Madras सह मिळून हे Move App डेव्हलप केलं आहे. हे App युजर्सला त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या ब्लॅक स्पॉटबाबत अलर्ट करेल, जेणेकरुन ड्रायव्हर सावधगिरी बाळगू शकतील आणि पुढील प्रवास, ड्रायव्हिंग सावधपणे करू शकतील.
युजर्स असुरक्षित रस्ता, रोड आणि ट्रॅफिक समस्या या App द्वारे रिपोर्ट करू शकतात. हे App IIT, Madras एनालिलिस करेल आणि याचा वापर सरकार रोड समस्या सुधारण्यासाठी करेल.
Android Users हे App Google Play Store आणि Apple App Store वरुन डाउनलोड करू शकतात. App डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा. एखाद्या अपघाताबाबत App मध्ये रिपोर्ट करायचं असल्यास सर्वात खाली दिलेल्या Report an Issue वर जावं लागेल. इथे अनेक कॅटेगरी दिसतील. त्यात ट्रॅफिकपासून रोड कंडिशनपर्यंत रिपोर्ट करू शकता. रस्त्यात काही समस्या, अडथळे असल्यास ड्रायव्हिंगवेळी अलर्ट केलं जाईल.