मुंबई, 25 फेब्रुवारी : सोशल मीडियाचा (social media) सध्या मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो आहे. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जातात. त्यामुळे आता केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलली आहेत. सोशल मीडियाबाबत केंद्र सरकारनं नवीन नियमावली जारी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी हे नियम बंधनकारक असणार आहेत. सोशल मीडियासाठी जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांवलीची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद (Ravi shankar prasad) यांनी दिली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानसंबंधी नव्या नियमांनुसार सरकारला जी सोशल मीडिया पोस्ट आक्षेपार्ह वाटेल ती पोस्ट सरकारनं आदेश दिल्यानंतर 36 तासांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी हटवावी.
सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो याबाबत अनेक तक्रारी येत असतात. सोशल मीडिया कंपन्या भारतात आपला व्यवसाय करू शकतात. पण सोशल मीडियाचा गैरवापराबाबत तक्रार देण्यासाठीदेखील फोरम असावं. आम्ही लवकरच एक महत्त्वाच्या सोशल मीडिया इनर्मिडीएरीसाठी युझर्सची संख्या सांगणार. त्यांच्या तक्रारीसाठी फोरम ठेवावं लागेल. त्यांना तक्रार अधिकाऱ्याचं नावही द्यावं लागेल. जो 24 तासांत तक्रार नोंदवेल आणि 15 दिवसांत त्या तक्रारीचं निवारण करेल. तक्रार मिळाल्यानंतर 24 तासांत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट हटवावी लागेल, असं रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं. हे वाचा - सावधान! क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये अँड्रॉइड app ठरतंय धोकादायक शिवाय आक्षेपार्ह मेसेज सर्वात आधी पाठवणाऱ्याबाबत कोर्ट किंवा सरकारला माहिती द्यावी लागेल, असंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे.