JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Netflix युजर्स शेअर करू शकणार नाहीत पासवर्ड, भरावं लागेल अतिरिक्त शुल्क

Netflix युजर्स शेअर करू शकणार नाहीत पासवर्ड, भरावं लागेल अतिरिक्त शुल्क

Netflix Password Sharing: नेटफ्लिक्सनं म्हटलं आहे की, ‘शेवटी आम्ही खातं शेअर करणाऱ्या वापरकर्त्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.’

जाहिरात

Netflix युजर्स शेअर करू शकणार नाहीत पासवर्ड, भरावं लागेल अतिरिक्त शुल्क

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑक्टोबर: ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पासवर्ड शेअरिंगची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. नेकफ्लिक्सचं म्हणणं आहे की काही काळानंतर वापरकर्ते नेटफ्लिक्स खात्याचा पासवर्ड त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह सामायिक करू शकणार नाहीत. आता नेटफ्लिक्सनं पासवर्ड शेअर करणाऱ्या युजर्सकडून अतिरिक्त शुल्क घेण्याची तयारी केली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की प्लॅटफॉर्मच्या कमी वाढीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पासवर्ड शेअरिंग. हे पाहता कंपनी 2023 च्या सुरुवातीपासून त्या वापरकर्त्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात करेल. नेटफ्लिक्सनं दिली ही माहिती- नेटफ्लिक्सचा त्रैमासिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे. अहवाल प्रसिद्ध होताच नेटफ्लिक्सनं सांगितले की, ‘शेवटी, आम्ही खाते शेअर करणाऱ्या वापरकर्त्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 च्या सुरुवातीपासून, या वापरकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. युजर्सची वाढ खुंटली- नेटफ्लिक्सचे प्रोडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर चेंगहाई लाँग म्हणाले की त्यांच्या सदस्यांना नेटफ्लिक्सचे चित्रपट आणि टीव्ही शो खूप आवडतात. इतके की ते ते अधिकाधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. परंतु वापरकर्ते ज्या प्रकारे नेटफ्लिक्स खात्याचा पासवर्ड त्यांच्या कुटुंब आणि मित्रांमध्ये सामायिक करतात, त्यामुळे ते नेटफ्लिक्सचे सदस्यत्व घेत नाहीत. यामुळेच नेटफ्लिक्सचे यूजर्स वाढत नाहीत आणि कंपनीचे नुकसान होते. हेही वाचा:  ‘या’ वेबसाइट्सवर दिवाळीची खरेदी होईल आणखी स्वस्त, अर्ध्या किमतीत मिळतायेत प्रोडक्ट्स OTT हे भविष्य आहे - नेटफ्लिक्सचे अधिकारी म्हणतात की, ‘मनोरंजन उद्योगाचे OTT प्लॅटफॉर्म हे भविष्य आहे. इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म मालक त्यांची उत्पादने वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. तेव्हा त्यांना यावेळी नफा मिळत नसला तरी भविष्यात त्यांना त्यावर भरपूर नफा मिळणार आहे.

इतके पैसे द्यावे लागतील- सध्या नेटफ्लिक्सने आपल्या नवीन प्लानशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार नवीन प्लॅनची ​​मासिक किंमत 3 ते 4 डॉलर्स (सुमारे 249 ते 332 रुपये) दरम्यान असू शकते. वापरकर्त्यांसाठी एक नवीन सिस्टीम आहे. उदाहरणार्थ, ज्या युजर्सना अतिरिक्त शुल्क भरायचं नाही, ते नेटफ्लिक्स मायग्रेशन टूलचा वापर करू शकतात. नवीन टूलच्या मदतीनं वापरकर्ते त्यांचं प्रोफाइल सहजपणे ट्रान्सफर करू शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या