JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Xiaomi च्या 'या' फोनचा रेकॉर्डब्रेक सेल; पहिल्याच दिवशी 200 कोटी स्मार्टफोनची विक्री

Xiaomi च्या 'या' फोनचा रेकॉर्डब्रेक सेल; पहिल्याच दिवशी 200 कोटी स्मार्टफोनची विक्री

2021 च्या सुरवातीलाच MI ने धमाकेदार फोन लाँच केला आहे. या फोनला असलेल्या 108 मेगापिक्सलच्या कॅमेरामुळे (Camera) हा फोन सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जानेवारी : विविध फीचर्स असलेले आणि सर्वसामान्याच्या आवाक्यातले निरनिराळे फोन MI लाँच करतो. यावेळी 2021 च्या अगदी सुरवातीलाच भारतात MI ने MI 10I लाँच केला. MI 10I अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि MI च्या ऑफिशिअल साईटवर ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात. Xiaomi चे CEO मनू कुमार जैन (Manu Kumar Jain) यांनी ट्विट करून, MI ने पहिल्या सेलमध्येच  200 कोटींची कमाई केली असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी MI च्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

संबंधित बातम्या

हे आहेत फीचर्च:-  MI 10i मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + (2400 x 1080 पिक्सल) रिजोल्यूशन डॉट डिस्प्ले आहे. स्क्रीनचा अडेप्टिव सिंक रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. फोनच्या सुरक्षेसाठी  फ्रंट आणि बॅकवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे.  MI10I मध्ये पॅसिफिक सनराईज, अटलांटिक ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक हे 3रंग उपलब्ध आहेत.

(वाचा -  मोबाईलमध्ये हे Apps असल्यास लगेच डिलीट करा; फोन हॅक होण्याची शक्यता )

शाओमीच्या MI 10I स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आणि एक्स 5 2 जी मॉडेम आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशनमुळे चर्चेत आलेल्या या स्मार्टफोनला चार बॅक कॅमेरे देण्यात आले आहेत. यात अपर्चर एफ/1.75 सह 108 मेगापिक्सल प्रायमरी (Samsung HM2) सेंसर, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल,  2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. तसंच 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही  देण्यात आला आहे.

(वाचा -  Motorola चे 4 नवे स्मार्टफोन्स लाँच; जाणून घ्या फोनच्या किंमती आणि फीचर्स )

MI 10I या फोनला 4820mAh बॅटरीसह बॉक्समध्ये 33 वॅटचा फास्ट चार्जर आहे. तसंच कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल-स्टिरिओ स्पीकर्स, 3.5.mm मीमी हेडफोन जॅक, यूएसबी टाईप-सी पोर्ट, IR सेंसर आहे. Xiaomi चा हा सुपर फीचर फोन घेण्यासाठी ग्राहकांना 6 जीबी रॅम + 64 जीबीसाठी  20999 रुपये, 128 जीबी स्टोरेजसाठी  21,999 रुपये, तर 8 जीबी + 128 जीबीसाठी 23,999 रुपये मोजावे लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या