JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Whatsapp: 'या' ट्रिकच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करता पाठवता येतो मेसेज

Whatsapp: 'या' ट्रिकच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करता पाठवता येतो मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर (Feature) लॉंच करत असतं. वैशिष्ट्यपूर्ण फीचर्समुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या लोकप्रियतेत भर पडत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट:  व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वांत लोकप्रिय सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म (Social Messaging Platform) आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ऑडिओ, व्हिडिओ, फोटो, कंटेट शेअर करता येतो. तसंच या प्लॅटफॉर्मवरून युजर्स ऑडिओ, व्हिडिओ आणि ग्रुप कॉलही करू शकतात. कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा प्रामुख्याने उपयोग होतो. गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसीच्या (Privacy) मुद्द्यावरून चर्चेत आहे. मात्र याचा फारसा परिणाम युजर्सच्या संख्येवर झाला नसल्याचं दिसून येतं. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर (Feature) लॉंच करत असतं. वैशिष्ट्यपूर्ण फीचर्समुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या लोकप्रियतेत भर पडत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स आहेत. मात्र काही फीचर्स बहुतांश लोकांना माहिती नसतात. आज आम्ही तुम्हाला मेसेजच्या अनुषंगानं एक खास ट्रिक (Trick) सांगणार आहोत. यामुळे मेसेज (Message) करणं अधिक सोपं होईल. या विषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे. हेही वाचा -  भारतात 6G कधी लाँच होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ सर्वसामान्यपणे, व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज करण्यासाठी आपल्याला अ‍ॅप ओपन करावं लागतं. पण एका खास ट्रिकमुळे तुम्हाला आता मेसेज सेंट करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ओपन करण्याची गरज नाही. याचाच अर्थ व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करता तुम्ही त्यावरून एक सेकंदात मेसेज सेंट करू शकता. यासाठी एक प्रक्रिया आहे. सर्वप्रथम ज्या व्यक्तींसोबत तुम्ही जास्त वेळा संवाद साधता, अशा व्यक्ती शोधा. त्यानंतर त्यांच्यासोबतची चॅट तुम्ही स्मार्टफोनच्या स्क्रीनवर अ‍ॅड करा. त्यानंतर त्या व्यक्तीचा चॅटबॉक्स ओपन करा. चॅटबॉक्स (Chatbox) ओपन केल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतील. त्यावर क्लिक करताच तुम्हाला `अ‍ॅड चॅट शॉर्टकट` हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर चॅटबॉक्स अ‍ॅड होईल. त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तींना व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताही मेसेज करू शकता तसंच त्यांच्याशी संवाद साधू शकता. व्हॉट्सअ‍ॅपवर या सारखे अनेक शॉर्टकट्स (Shortcuts) आहेत. या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप सुरू न करता कोणालाही मेसेज पाठवू शकता. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि समोरच्या व्यक्तीला मेसेजही लवकर पोहोचेल. सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज करायचा असेल तर सर्वप्रथम अ‍ॅप ओपन करावं लागतं. त्यानंतर स्क्रीनवर त्या व्यक्तीसोबत केलेलं चॅट शोधावं लागतं आणि नंतर मेसेज टाइप करून पाठवावा लागतो. या सर्व क्रियेत खूप वेळ जातो. पण व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या ट्रिकमुळे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करता मेसेज सेंट करू शकता. ही ट्रिक वापरायला देखील खूप सोपी आणि सुलभ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या