नवी दिल्ली, 14 मार्च : मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप (Whatsapp) सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे. नातेवाईक, मित्रांसोबतच्या चॅटसह अनेक ऑफिसच्या कामाचे चॅटही यावर मोठ्या प्रमाणात केले जातात. त्यामुळे ते सेफ, सुरक्षित ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. व्हॉट्सअॅप चॅट सिक्योर ठेवण्यासाठी सेटिंग्जमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरु शकतं. . Disappearing Messages - Disappearing Messages हे फीचर व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी लाँच केलं. हे फीचर इनेबल केल्यानंतर चॅट 7 दिवसांत आपोआप हटवले जातात. चॅटचे स्क्रिनशॉट काढूनही त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे हे फीचर वापरणं फायद्याचं ठरतं. हे फीचर इनेबल करण्यासाठी Whatsapp मध्ये ज्या कॉन्टॅक्टसाठी मेसेज डिसअपीयर फीचर वापरायचं आहे, त्याला सिलेक्ट करा. उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यानंतर व्ह्यू कॉन्टॅक्टमध्ये Disappearing Messages फीचर इनेबल करा. Two-Step-Verification - Two-Step-Verification फीचर एका एक्स्ट्रा सिक्योरिटी फीचरप्रमाणे काम करतं. हे फीचर इनेबल केल्याने, व्हॉट्सअॅपला रिसेट किंवा व्हेरिफाय केलं जातं, त्यावेळी पीन मागितला जातो. फोन किंवा सीम हरवल्यास हे फीचर फायद्याचं ठरेल. अनोखळी व्यक्तीला Whatsapp अकाउंट अॅक्सेस करणं कठिण जाईल. जर तुम्ही पीन विसरलात, तर तुमच्या मेलवर लिंक पाठवली जाईल. ज्यावर क्लिक करुन तुम्ही हे फीचर डिसेबल करू शकता.
हे फीचर इनेबल करण्यासाठी Whatsapp च्या सेजिंग्जमध्ये जा. अकाउंट सेटिंगमध्ये Two-Step-Verification ला इनेबल करा. त्यानंतर 6 अंकी पीन सेट करावा लागेल. त्यानंतर ओके करा. टच आयडी किंवा फेस आयडी - Whatsapp टच आयडी किंवा फेस आयडीने लॉक केल्यावर आणखी एक सिक्योरिटी लेयर अॅक्टिव्ह होते. आयफोनवर हे केलं जाऊ शकतं. तर अँड्रोईडवर फिंगरप्रिंट लॉक इनेबल केलं जाऊ शकतं. हे फीचर इनेबल करण्यासाठी Whatsapp सेटिंग प्रायव्हसी ऑप्शनमध्ये स्क्रिन लॉक ऑप्शनमध्ये जा. टच आयडी किंवा फेस आयडी टर्न ऑन करा. नंतर किती वेळात व्हॉट्सअॅप आपोआप लॉक व्हावं यासाठी टाईम सिलेक्ट करा. अनलॉक करण्यासाठी टच आयडी किंवा फेस आयडी द्यावा लागेल.
ब्लॉक किंवा स्पॅम रिपोर्ट - जर युजरला एखाद्या कॉन्टॅक्ट किंवा बिजनेसमुळे Whatsapp वर असुरक्षित वाटत असेल, तर तो त्या कॉन्टॅक्ट किंवा बिजनेसला ब्लॉक करू शकतो. त्यामुळे तो कॉन्टॅक्ट युजरचं लास्ट सीन किंवा प्रोफाईल फोटो पाहू शकणार नाही. ब्लॉक युजर कॉलही करू शकणार नाही.
ग्रुप सेटिंग - Whatsapp युजरला ग्रुपमध्ये कोणीही अॅड करू शकतं. परंतु ही सेटिंगही बदलता येऊ शकते. हे फीचर इनेबल करण्यासाठी Whatsapp च्या प्रायव्हसीमध्ये ग्रुप सेटिंग्जवर क्लिक करा, तेथे ग्रुपमध्ये कोण अॅड करू शकतं त्यासाठी Everyone, My Contacts, My Contacts Except असे पर्याय दिसतील. यातील हवा तो पर्याय सिलेक्ट करता येईल.