नवी दिल्ली, 26 जुलै : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क अतिशय महत्त्वाची वस्तू ठरते आहे. लोक इतर वेळी मास्क लावतात आणि नेमकं बोलताना खाली घेतात, अशी अनेक लोकं पाहण्यात आली आहेत. अशाने त्या मास्कचा मूळ उद्देशच नाहीसा होतो. यामुळेच एलजी कंपनी (LG) असा मास्क लाँच करत आहे, ज्यामध्ये माइक आणि स्पीकरही (LG mask with speaker) असेल. गेल्या वर्षी एलजीने प्युरीकेअर (PuriCare) हा वेअरेबल एअर प्युरिफायर मास्क लाँच केला होता. या मास्कचं बीटा मॉडेल आता अपडेट करण्यात येत आहे. यामधील मायक्रोफोन आणि स्पीकर व्हॉईसऑन (VoiceON) या टेक्नॉलॉजीच्या आधारे काम करतात. हा मास्क वापरणाऱ्यांना समोरच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी मास्क काढण्याची किंवा ओरडून बोलण्याची गरज भासणार नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा मास्क युजरचा आवाज आपोआप ओळखतो, आणि याच्या बिल्ट इन स्पीकर्समुळे (Built in speaker)समोरच्या व्यक्तीलाही युजरने काय म्हटलं आहे हे स्पष्टपणे ऐकू जातं. माइक आणि स्पीकर असूनही या मास्कचं वजन कमी आहे. यूजर अगदी दिवसभर हा मास्क लावून राहू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे. या मास्कमध्ये एलजीच्या खास एअर सोल्यूशन टेक्नॉलॉजीचा (Air Solution Technology) वापर करण्यात आला आहे. या नव्या प्युरिकेअर वेअरेबल मास्कमध्ये लहान, हलकी मात्र तरीही एफिशिअंट मोटर असेल. जुन्या मॉडेलमध्ये असणारे ड्युअल फॅन्स (Dual Fans) जसेच्या तसे ठेवण्यात आल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. युजर्सचा श्वास घेण्याचा पॅटर्न पाहून त्यानुसार आपोआप एअर फ्लो कंट्रोल करण्याचं काम हे फॅन करतात. या मास्कचं वजन 94 ग्रॅम आहे. तसंच, यामधील 1000 mAH क्षमतेची बॅटरी आठ तास चालते. साध्या यूएसबी केबलने ही बॅटरी दोन तासात पूर्णपणे चार्ज होते. ‘तुम्ही पॉर्न पाहत आहात, दंड भरा’; पोलिसांच्या नावाने नोटीस पाठवत हजारोंना गंडा पुढील महिन्यात थायलँडमध्ये होणार लाँच - या मास्कची लाँच डेट अद्याप कंपनीने जाहीर केली नाही. मात्र, पुढील महिन्यात थायलँडमध्ये हा मास्क लाँच (LG mask Launch) होणार असल्याचं एलजीने स्पष्ट केलं आहे. इतर देशांमध्ये त्या-त्या सरकारच्या परवानगीनंतर मास्क लाँच करण्यात येईल, असंही कंपनीने सांगितलं. टोकियोमधील समर ऑलिम्पिक खेळांमध्ये थायलँडहून आलेल्या 120 खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी प्युरिकेअर मास्कचा वापर केला होता, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
गेल्या वर्षी लाँच झालेल्या प्युरिकेअर मास्कमध्ये दोन थ्री-स्पीड फॅन्स, सेंसर यांच्यासोबतच यूवी एलईडी लाईट्सही आहेत. या लाईट्स हानीकारक विषाणूंना मारतात. हा मास्क ठेवण्यासाठी कव्हर केसही देण्यात येते. तसंच, मास्कमधील फिल्टर बदलण्याची वेळ जवळ आल्यास एलजी थिनक्यू मोबाईल अॅपवर नोटिफिकेशनही पाठवण्यात येतं.