JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / SIM Cardशी संबंधित ‘ही’ चूक येईल अंगलट, खावी लागेल तुरुंगाची हवा

SIM Cardशी संबंधित ‘ही’ चूक येईल अंगलट, खावी लागेल तुरुंगाची हवा

सिम कार्ड फ्रॉड असो किंवा सिम कार्ड स्वॅपिंग, याविषयी तुम्ही ऐकलं असेलच, परंतु असं असूनही कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात, ज्यामुळं आपल्यापुढं समस्या उभ्या राहू शकतात.

जाहिरात

SIM Cardशी संबंधित ‘ही’ चूक येईल अंगलट, खावी लागेल तुरुंगाची हवा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 डिसेंबर: आता जवळपास प्रत्येक व्यक्ती मोबाइल फोन वापरतो. मोबाइल चालण्यासाठी सिमकार्डची गरज असते. पण तुम्हाला माहित आहे का की सिमकार्डशी संबंधित काही चुकांमुळं तुम्हाला तुरुंगाची हवाही खावी लागू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुमचं उत्तर नाही असेल, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला  सिमकार्ड वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग पाहूया की सिमकार्ड वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? सिम कार्ड फसवणूक (SIM Card Fraud): तुम्ही एक गोष्ट पक्की लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे तुमचं सिम कार्ड कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडू देऊ नका, असं झाल्यास कोणीही तुमच्या कार्डचा गैरवापर करू शकतो आणि इतर कोणाचीही फसवणूक करू शकतो. तुमच्या नंबरवरून फसवणूक झाली तर तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. सिम कार्ड स्वॅपिंग (SIM Card Swapping) : तुमचं सिमकार्ड कधीही ठेवण्यासाठी किंवा वापरण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला देऊ नका डुप्लिकेट सिम कार्ड तयार करून किंवा सिम कार्डचा क्लोन करून तुमचा नंबर चुकीच्या कामात वापरला जाऊ शकतो. आणि त्यामुळं तुम्ही अडचणीत येऊ शकता. हेही वाचा-  Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत? तुमच्याकडे अतिरिक्त सिम असल्यास घ्या विशेष काळजी: जर तुमच्याकडे अतिरिक्त सिम कार्ड असेल, जे तुम्ही इकडे तिकडे ठेवून विसरलात, तर ही चूक अंगलट येऊ शकते. कारण तुमचे सिम एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडले असेल तर तुमच्या नंबरवरून चुकीच्या गोष्टी होऊ शकतील. तो नंबर गुन्हेगारी कृतीसाठी देखील वापरला जाऊ शकतो, ज्यामुळे तुरुंगवास होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या