JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर एकाचवेळी करता येईल 50 जणांना Video Call, वाचा काय आहे नवीन फीचर

WhatsApp वर एकाचवेळी करता येईल 50 जणांना Video Call, वाचा काय आहे नवीन फीचर

काही दिवसांपूर्वी फेसबुकने मेसेंजर रुम्स (Messenger Rooms) फीचरची सुरुवात केली आहे. यातून युजर एकाचवेळी 50 लोकांबरोबर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून जोडले जातात. आता WhatsApp वर देखील हे फीचर वापरता येणार आहे.

जाहिरात

पण click to chat केल्यानं आपली माहिती गुगलमध्ये दिसते याबद्दल वापरकर्त्यांना कोणतीही माहिती नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जून : काही दिवसांपूर्वी फेसबुकने मेसेंजर रुम्स (Messenger Rooms) फीचरची सुरुवात केली आहे. यातून युजर एकाचवेळी 50 लोकांबरोबर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून जोडले जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आघाडीवर असणाऱ्या फेसबुकने (Facebook)ने इन्स्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) साठी देखील हे फीचर सुरू केले आहे. अँड्राइड वर्जनमध्ये हे फीचर मिळण्यास हळू हळू सुरूवात होत आहे. या फीचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप युजर्स स्वत:हून कॉलची सुरुवात करू शकतात किंवा कोणत्याही रूममध्ये जोडले देखील जाऊ शकतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रृपसारखे व्हिडीओ कॉलचे हे फीचर एंड टू एंड इनक्रिप्टेड नाही आहे. जाणून घ्या कसा कराल 50 जणांना व्हिडीओ कॉल -या प्रकारे व्हिडीओ कॉल करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये WhatsApp चे नवीन वर्जन (Latest Version) असणे आवश्यक आहे -त्याचप्रमाणे इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील चांगली असणे गरजेचे आहे (हे वाचा- युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून डोळे फिरतील ) -फेसबुक मेसेंजरचे देखील लेटेस्ट वर्जन असणे गरजेचे आहे -या मेसेंजर अ‍ॅपमध्ये तुमच्या फेसबुकने लॉग इन करा व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करण्यासाठी रुम्स तयार करावी लागले. कशी कराल ही रुम तयार? -सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि त्यामध्ये वरती असणाऱ्या कॉल टॅबवर क्लिक करा -त्यामध्ये क्रिएट रुम पर्यायावर क्लिक करा -त्यानंतर मेसेंजर पर्यायावर Continue वर क्लिक करा (हे वाचा- कोरोनावरील उपचारासाठी ‘हे’ औषध धोकादायक, मृतांची संख्या आणखी वाढेल; WHOचा इशारा ) -यानंतर तुम्हाला मोबाइलमधील ब्राउजरच्या माध्यमातून मेसेंजर अ‍ॅप किंवा मेसेंजर वेबसाइटवर रिडायरेक्ट केले जाईल. कारण हे ‘रुम फीचर’ व्हॉट्सअ‍ॅप बाहेर मेसेंजरमध्ये काम करते -त्यानंतर तुम्हाला ट्राय इट यावर टॅप करावे लागेल -त्यानंतर क्रिएट रुम पर्यायावर क्लिक करा आणि रुमचे नाव बदलू शकता. -ही तयार केलेली रुम तुम्ही कस्टमाइझ देखील करू शकता. याकरता रुम अ‍ॅक्टिव्हिटीवर क्लिक करा. -सेंड लिंक ऑन व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा उघडेल. याठिकाणी तुम्हाला सर्च करून तुमच्या फोनमधील काँटॅक्ट जोडता येतील. किंवा तुम्हाला ज्या लोकांबरोबर रुम क्रिएट करायची आहेत, त्यांना देखील ही लिंक पाठवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या