एकच नंबर! Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळते तब्बल 336 दिवसांची वॅलिडिटी
मुंबई 11 ऑक्टोबर : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच असं प्लॅन आणत असतं, ज्याचा ग्राहकांना फायदा होईल. ग्राहकांची सोय लक्षात घेऊन, कंपनी प्रत्येक श्रेणीचे प्लॅन ऑफर करते, जेणेकरुन लोक त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या बजेटनुसार रिचार्ज करू शकतील. कंपनी ग्राहकांसाठी अशा काही योजना देखील ऑफर करते, ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी आहे. तुम्ही देखील जीओ फोन युजर्स आहात, तर तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच कामाची आहे, कारण तुम्ही देखील तुमच्या बजेट फ्रेंडली jio प्लान शोधत असाल, जो कमी किमतीत फ्री कॉलिंग आणि अधिक वैधतेसह येतो, तर चला जाणून घेऊ. आज आम्ही ज्या प्लानबद्दल सांगणार आहोत तो खास JioPhone साठी आहे. या प्लॅनची किंमत फक्त 75 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंग, भरपूर डेटासह अनेक फायदे दिले जातात. Jio च्या या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 23 दिवसांची वैधता मिळते. केवळ 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 2.5GB डेटाचा लाभ मिळतो. यासोबत ग्राहकांना 200MB मोफत दिले जात आहेत. ज्या ग्राहकांना फक्त कॉलिंगसाठी फोन सुरु ठेवायचा असेल आणि त्यांचा इंटरनेट युज जास्त नसेल. अशा ग्राहकांसाठी हा प्लान खरंच कामाचा आहे. जाणून घ्या या प्लॅनबद्दल ग्राहक संपूर्ण 23 दिवसात 2.5GB + 200MB डेटा वापरू शकतो. याशिवाय प्लॅनमध्ये एकूण 50 एसएमएस देखील देण्यात आले आहेत. या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलताना, Jio आपल्या ग्राहकांना Jio ऍप्सचा विनामूल्य प्रवेश देते. Jio च्या संगीत, चित्रपटांमधून अनेक अॅप्स समाविष्ट आहेत, ज्यात Jio Cinema, JioSaavn सारखे ऍप आहेत. (Disclaimer: Network18 आणि News18lokmat चॅनेल/वेबसाइट ची संचालक संस्था ही एक स्वतंत्र मीडिया ट्रस्ट आहे ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)