JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Jio 5G कधी लाँच होणार? रिचार्जसाठी किती मोजावे लागणार पैसे? ‘या’ दिवशी होऊ शकतो खुलासा

Jio 5G कधी लाँच होणार? रिचार्जसाठी किती मोजावे लागणार पैसे? ‘या’ दिवशी होऊ शकतो खुलासा

Jio 5G Launch Date: जिओ लवकरच 5G सेवा सुरू करू शकते. या महिन्याअखेरीस लॉन्च डेटची माहिती मिळू शकते.

जाहिरात

Jio 5G कधी लाँच होणार? रिचार्जसाठी किती मोजावे लागणार पैसे? ‘या’ दिवशी होऊ शकतो खुलासा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑगस्ट: 5G स्पेक्ट्रम लिलावानंतर आता सर्वांना 5G सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. कंपन्यांनी लवकरच 5G सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत, परंतु अजूनही लाँच होण्याची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. एअरटेलनं स्पष्ट केले आहे की, ते या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्येच त्यांची 5G सेवा सुरू करतील. अशा परिस्थितीत भारतीय दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेला जिओ आपली 5G सेवा सुरु करणार (Jio 5G Launch Date) याबाबत उत्सुकता आहे. जिओच्या प्रवेशानंतर भारतीय दूरसंचार उद्योग खूप बदलला. कंपनीकडे केवळ 4G नेटवर्क असतानाही ग्राहकांना आकर्षित करण्यात ती यशस्वी ठरली. आता 5G ची वेळ आहे आणि इथे जिओला एअरटेलशी स्पर्धा करावी लागणार आहे. Jio 5G कधी लॉन्च होईल? एअरटेल या महिन्याच्या अखेरीस आपली 5G सेवा सुरू करणार आहे आणि Jioही आपली सेवा सुरु करू शकते. तथापि, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु काही संकेत नक्कीच देण्यात आले आहेत. 5G स्पेक्ट्रम लिलावानंतर, कंपनीनं जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की ते त्यांची 5G सेवा आझादीच्या अमृत महोत्सवापासून सुरू करतील. या महिन्यात जिओ आपली 5G सेवा देखील सुरू करू शकते असा अंदाज आहे. हेही वाचा-   200 MP चा कॅमेरा, मिनिटांमध्येच होणार चार्ज, लवकरच लॉन्च होणार जबरदस्त Smartphone

 Jio 5G प्लॅनची होऊ शकते घोषणा-

या महिन्यात Airtel 5G च्या तारखेची घोषणा आणि Jio ची या महिन्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. वास्तविक, 29 ऑगस्ट रोजी RIL ची AGM म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. जिओच्या मूळ कंपनी रिलायन्सच्या या बैठकीत मोठी घोषणा केली जाऊ शकते. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दरवर्षी Jio शी संबंधित अनेक मोठ्या घोषणा केल्या जातात. हे शक्य आहे की, यावेळी Jio 5G च्या लॉन्च तारखेबद्दल तपशील, आणि इतर माहिती मिळेल. या दिवशी कंपनी आपली सेवा देखील सुरू करू शकते. अलीकडेच Jio ने माहिती दिली होती की, त्यांचे 5G कव्हरेज प्लॅनिंग 1000 शहरांमध्ये पूर्ण झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या