मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

200 MP चा कॅमेरा, मिनिटांमध्येच होणार चार्ज, लवकरच लॉन्च होणार जबरदस्त Smartphone

200 MP चा कॅमेरा, मिनिटांमध्येच होणार चार्ज, लवकरच लॉन्च होणार जबरदस्त Smartphone

गेल्या काही वर्षांत देशभरात स्मार्टफोन (Smartphone) युझर्सची संख्या वेगानं वाढत आहे. सध्या बाजारात वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेले विविध कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. लवकरच देशभरात 5G सेवा सुरू होणार आहे.

गेल्या काही वर्षांत देशभरात स्मार्टफोन (Smartphone) युझर्सची संख्या वेगानं वाढत आहे. सध्या बाजारात वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेले विविध कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. लवकरच देशभरात 5G सेवा सुरू होणार आहे.

गेल्या काही वर्षांत देशभरात स्मार्टफोन (Smartphone) युझर्सची संख्या वेगानं वाढत आहे. सध्या बाजारात वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेले विविध कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. लवकरच देशभरात 5G सेवा सुरू होणार आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांत देशभरात स्मार्टफोन (Smartphone) युझर्सची संख्या वेगानं वाढत आहे. सध्या बाजारात वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेले विविध कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. लवकरच देशभरात 5G सेवा सुरू होणार आहे. त्याअनुषंगानेदेखील अनेक कंपन्यांनी नवीन मॉडेल्स लॉन्च करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G (Infinix Zero Ultra 5G) या स्मार्टफोनशी निगडित काही बाबी लीक (Leak) झाल्याची चर्चा होती. सुमारे एक महिन्यापूर्वी देशभरातल्या बाजारात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आणि प्राइस रेंजमुळे हा फोन चर्चेत होता. आता पुन्हा हा नवा स्मार्टफोन चर्चेत आला आहे. या वेळी फोनचे तांत्रिक डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च टाइमलाइन या बाबी लीक झाल्या आहेत. या फोनमध्ये 200 MP कॅमेरा आणि 180 W चार्जिंग सपोर्ट असू शकतो, असं बोललं जात आहे. इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G हा स्मार्टफोन पुन्हा चर्चेत आला आहे. टिपस्टर पारस गुगलानी यांनी या स्मार्टफोनची प्रमुख स्पेसिफिकेशन्स (Specifications) नुकतीच शेअर केली आहेत. हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. तसंच तो या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. हा फोन भारतात लवकरच दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G हा स्मार्टफोन 25,000 ते 30,000 रुपयांदरम्यान उपलब्ध होऊ शकतो. स्पेसिफिकेशन्सचा विचार करता इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G मध्ये 200 MP प्रायमरी कॅमेरा (Camera) असेल, असं बोललं जात आहे. इन्फिनिक्सचा हा पहिला, तसंच वरील किमतीत उपलब्ध होणारा दुर्मीळ फोन असेल. या स्मार्टफोनमध्ये मेन लेन्ससोबत अजून दोन सेन्सर असण्याची शक्यता आहे. यात एक टेलीफोटो लेन्स आणि एक मॅक्रो लेन्स असू शकते. इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G या स्मार्टफोनच्या अन्य फीचर्समध्ये एक फास्ट चार्जिंग सपोर्ट (Fast Charging Support) हे असू शकतं. यात 4700mAhची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 180W थंडर चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. या फोनची बॅटरी केवळ चार मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. हा फोन आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 12 (Android 12) OS वर चालेल आणि त्यावर XOS असेल. इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G हा नवा स्मार्टफोन एक मिड-बजेट फ्लॅगशिप (Flagship) असेल. त्याला कर्व्ह्ड डिस्प्ले, उत्तम कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये झीरो अल्ट्रा 5G मीडियाटेक डायमेंसिटी 920 5G चिप असेल. यात 8GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज असेल. याविषयी अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या डिव्हाइसमध्ये कर्व्ह्ड पॅनेल असेल. 6.7 इंचाचा पंच होल AMOLED डिस्प्ले असू शकेल. यात हाय रिफ्रेश रेट सपोर्ट असू शकतो. सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.
First published:

Tags: Mobile, Smartphone

पुढील बातम्या