JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 5G Smartphone ताबडतोब खरेदी करणं गरजेचं? 4G स्मार्टफोन युजर्सना येऊ शकतात ‘या’ समस्या

5G Smartphone ताबडतोब खरेदी करणं गरजेचं? 4G स्मार्टफोन युजर्सना येऊ शकतात ‘या’ समस्या

4G Smartphone vs 5G smartphone: भारतात आजपासून 5G तंत्रज्ञान सुरु झालं आहे आणि 5G स्मार्टफोन देखील बाजारात आले आहेत. परंतु तरीही बरेच लोक 4G फोन वापरत आहेत. जर तुम्ही अजूनही जुना स्मार्टफोन वापरत असाल तर तो बदलणं का आवश्यक आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात

या शहरांमध्येही मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारतात 5G तंत्रज्ञान लाँच झालं. 5G तंत्रज्ञानाबद्दल कंपन्यांसह ग्राहकांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. 5G तंत्रज्ञान येण्याआधीच भारतातील बहुतेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे 5G स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत. परंतु तरीही अजूनही कित्येक लोक 4G स्मार्टफोन वापरत आहेत. जोपर्यंत 5G तंत्रज्ञान लॉन्च होत नाही, तोपर्यंत तुम्ही 4G स्मार्टफोन वापरू शकता आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही, परंतु 5G तंत्रज्ञान सुरू झाल्यानंतरही तुम्ही 4G स्मार्टफोन चालवत असाल तर तुमचं काही बाबतीत नुकसान होऊ शकतं. 5G स्मार्टफोन अनेक बाबतीत 4G स्मार्टफोनपेक्षा चांगले आहेत. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला 5G तंत्रज्ञान आल्यानंतर ते 4G स्मार्टफोन वापरल्यास कसं नुकसान होऊ शकतं हे सांगणार आहोत. कॉल ड्रॉप समस्या- 4G स्मार्टफोनची एक सामान्य समस्या म्हणजे कॉल ड्रॉप. कॉल ड्रॉपची समस्या कोणत्याही वापरकर्त्याला खूप त्रास देऊ शकते आणि यामुळे तुमचा बराच वेळ वाया जातो. 5G तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर तुमची अशा समस्येपासून सुटका होईल कारण 5G तंत्रज्ञान खूप हायटेक आहे आणि नेटवर्कची गुणवत्ता देखील खूप जबरदस्त आहे, ज्यामुळे तुम्ही कॉल ड्रॉपच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. हेही वाचा:  सावधान! 5Gमुळं तुम्ही कंगाल तर होणार नाही ना? तज्ज्ञांनी दिला सावधतेचा इशारा, वाचा कारण

स्लो इंटरनेट स्पीड- 4G स्मार्टफोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांना माहीत आहे की त्यांना काही वेळा इंटरनेटचा वेग कमी होतो. वास्तविक, जेव्हा स्मार्टफोन अपडेट केले जातात, तेव्हा त्यातील समस्या देखील दूर केल्या जातात आणि जर तुम्ही 4G स्मार्टफोन चालवला तर तुम्हाला कमी इंटरनेट स्पीडचा सामना करावा लागू शकतो कारण 5G तंत्रज्ञान केवळ 5G स्मार्टफोनशी सुसंगत आहे, अशा 4G स्मार्टफोनमध्ये तुम्ही ते वापरू शकणार नाही. यामुळं 4G स्मार्टफोन युजर्सला बेस्ट लेव्हल एक्सपेरियन्स मिळणार नाही आणि इंटरनेट वापराची मजा जावू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या