JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 'अ‍ॅपल आयफोन 14'वर मिळतंय 45 हजारांपेक्षा अधिक डिस्काउंट, पाहा कुठे सुरुये ऑफर!

'अ‍ॅपल आयफोन 14'वर मिळतंय 45 हजारांपेक्षा अधिक डिस्काउंट, पाहा कुठे सुरुये ऑफर!

आयफोन 14 खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ ठरू शकते. कारण यावर बंपर डिस्काउंट मिळतोय. तुम्हीदेखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एका खास ऑफरबद्दल माहिती सांगणार आहोत.

जाहिरात

आयफोनवर डिस्काउंट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून : उत्तम लूक आणि पॉवरफुल फीचर्समुळे ‘अ‍ॅपल आयफोन ’ अनेकांना आवडतो. अ‍ॅपल कंपनीचा ‘आयफोन 14’ हा तर खूपच लोकप्रिय झालाय; पण त्या फोनची किंमत जास्त असल्यामुळे अनेकांना तो विकत घेता येत नाही. हा फोन घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. हा फोन एका ई-कॉमर्स वेबसाइटवरून घेतल्यास तब्बल 45 हजार रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळू शकतो. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलंय. आयफोन 14 खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ ठरू शकते. कारण यावर बंपर डिस्काउंट मिळतोय. तुम्हीदेखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एका खास ऑफरबद्दल माहिती सांगणार आहोत. आयफोन 14 आता फ्लिपकार्टवर 69,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत अधिकृत स्टोअर किमतीपेक्षा 9,901 रुपयांनी कमी आहे. याशिवाय, तुम्ही एचडीएफसी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून ईएमआयवर हा फोन खरेदी केल्यास अतिरिक्त 4,000 रुपये सूट मिळेल. त्यामुळे तुम्हाला हा फोन केवळ 65,999 रुपयांना मिळेल. Smartphone Tips: पावसाळा येतोय, आत्ताच तयारीला लागा! पाहा पाण्यात भिजल्यावर कसा सेफ ठेवायचा फोन विविध फीचर्स ‘आयफोन 14’मध्ये विविध फीचर्स आहेत. यात स्लिम बेझल्ससह 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. तसंच डिस्प्ले विस्तृत कलर गॅमट आणि एचडीआर सामग्रीला सपोर्ट करतो. तसंच 1200 निट्स ब्राइटनेस हे या फोनचं एक महत्त्वाचं फीचर आहे. फोन अनलॉकिंगसाठी डिव्हाइस फेस आयडी सेन्सर आहे. हे डिव्हाइस अ‍ॅपलच्या A15 बायोनिक चिपसेटद्वारे संचलित आहे. त्यामध्ये 16-कोर न्यूरल प्रोसेसिंग युनिट (NPU) आणि 5-कोअर ग्राफिक्स प्रोसेसर आहे. यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB असे विविध स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. आयफोन 14मध्ये ड्युएल-कॅमेरा सेटअप असून, बॅक व फ्रंटला 12-12 मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी डिव्हाइस डॉल्बी व्हिजन आहे. Car Care Tips: पावसाळ्यात ‘या’ 5 पद्धतींनी स्वच्छ ठेवू शकता कारची विंडस्क्रीन, ड्रायव्हिंग होईल सोपी! एक्स्चेंज ऑफर आयफोन 14 फ्लिपकार्टवर एक्स्चेंज ऑफरमध्येसुद्धा खरेदी करता येईल. तुम्ही तुमचा जुना हँडसेट एक्स्चेंज करून जास्तीतजास्त 35,000 रुपयांची सूट मिळवू शकता. ‘आयफोन 14’ची खरेदी करताना तुम्हाला एक्स्चेंज ऑफरमध्ये 35,000 रुपयांची सूट मिळाली, तर तुम्हाला हा फोन 30,999 रुपयांना मिळेल. याचाच अर्थ, आयफोन 14वर मूळ किमतीपेक्षा 48,901 रुपयांची मोठी सूट मिळेल; मात्र एक्स्चेंज ऑफरवरची सूट तुमच्या जुन्या हँडसेटच्या स्थितीनुसार असेल, हे लक्षात ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या