मुंबई, 14 जुलै : आयटी उद्योगातील (Information Technology) कंपन्यांसाठी काळजीची बातमी आहे. दिग्गज आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीनं काऊन्सिलिंग आणि कस्टमर तसंच पार्टनर सोल्युशन विभागांमधील वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. 0 जून रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कामाची पुनर्रचना केली असून त्यामध्ये हा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. या अहवालात असंही म्हटलं आहे, की मायक्रोसॉफ्ट इतर विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करणार असून; या आर्थिक वर्षाच्या शेवटी सध्यापेक्षा जास्त कर्मचारी आपल्याकडे असावेत असा कंपनीचा मानस आहे. “इतर कंपन्यांप्रमाणेच आम्हीदेखील आमच्या बिझनेस प्रायॉरिटीजचं नियमित मूल्यांकन करतो, आणि गरजेनुसार बदल करतो. त्याच प्रक्रियेत आज काही प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली. आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवणूक सुरू ठेवू, आणि येत्या वर्षात एकूण कर्मचारी संख्या वाढवू,” असं मायक्रोसॉफ्टने ब्लूमबर्गला पाठवलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दुसऱ्या एका अहवालानुसार, अल्फाबेट एन्कॉर्पोरेटच्या ‘गूगल’ने येत्या वर्षात संभाव्य आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया कमी (Google shows down Hiring) केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ‘2022-23 मध्ये कंपनी इंजिनीअरिंग, टेक्निकल आणि इतर महत्त्वाच्या जागांवर भरती करेल. पुढे जात असताना, आपल्याला अधिक तत्परता दाखवणं, लक्ष केंद्रित करणं आणि कामाची भूक वाढवणं या गोष्टींची गरज आहे,’ असं पिचाई यांच्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे. रुपयाच्या घसरणीने चिंता वाढली; मात्र देशातील ‘या’ राज्याला होऊ शकतो फायदा भारतातदेखील गेल्या काही महिन्यांमध्येच कित्येक स्टार्ट-अप कंपन्यांनी कॉस्ट-कटिंगसाठी (Indian Start-up Companies cost cutting) आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. अलीकडेच एज्युकेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील युनिकॉर्न कंपनी असलेल्या बायजूजने (Byju’s) 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता यामध्ये कायमस्वरुपी आणि कंत्राटी अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यापूर्वी वेदांतू (400), अनअकॅडमी (600+), कार्स24 (600) या कंपन्यांनी कामगार कपात केली होती. ओलानं (Ola) तर जानेवारी-मार्च या तीन महिन्यांमध्ये तब्बल 2,100 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. याशिवाय ई-कॉमर्स कंपनी मीशोने 150, फर्निचर रेंटल स्टार्टअप असलेल्या फर्लेन्को कंपनीने 200, सोशल-कॉमर्स स्टार्टअप असलेल्या ट्रेलने 300 आणि ओकेक्रेडिटने 40 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीही डाउनलोड करता येतं ई-पॅनकार्ड आघाडीची व्हेंचर कॅपिटल कंपनी सेक्युया कॅपिटलने (Sequoia Capital) अलीकडेच आपल्या 51 पानांच्या नोटमध्ये आपल्या पोर्टफोलिओ कंपन्यांच्या संस्थापकांना सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत हायपरग्रोथसाठी बक्षीस मिळण्याचं युग लवकर संपुष्टात येत आहे आणि गुंतवणूकदार सध्या अधिक नफा मिळवून देतील अशा कंपन्यांकडे वळत आहेत. निधीच्या (Indian Start-ups Funding) बाबतीत बोलायचं झाल्यास, भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी एप्रिल-जून 2022 या तिमाहीत एकूण 409 फंडिंग राउंड्समधून 6.9 बिलियन डॉलर्सचा निधी मिळवला. मागील तिमाहीत उभारलेल्या 10.3 बिलियन डॉलर्सच्या तुलनेत हा निधी 33 टक्क्यांनी कमी होता. ट्रॅक्सन जिओ क्वार्टरली रिपोर्ट : इंडिया टेक Q2 2022 या रिपोर्टनुसार, स्टार्टअप फंडरेझिंगमध्ये देखील मागील वर्षीच्या तुलनेत (Year-on-Year) घट झाली आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत, टॉप फंडरेझिंग स्टार्टअप्समध्ये व्हर्से (805 दशलक्ष डॉलर्स – सीरीज जे), दिल्लीवरी (304 मिलियन डॉलर्स – सीरीज जे), उडान (275दशलक्ष डॉलर्स – सीरीज डी), शेअरचॅट (255 दशलक्ष डॉलर्स – सीरीज जी) आणि अपग्रॅड (225 दशलक्ष डॉलर्स - सीरीज एफ) या कंपन्यांचा समावेश होता.