कमालच आहे राव! ट्विटर ब्लू टिकसाठी पैसे देण्यात भारतीयांना रसच नाही, वाचा इंटरेस्टिंग कारण
मुंबई, 15 नोव्हेंबर: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी सोशल मीडियातील सुप्रसिद्ध प्लॅटफॉर्म ट्विटरला विकत घेतलं आहे. यानंतर त्यांनी जाहीर केलं आहे की ट्विटरवर ब्लू टिक मार्क घेणार्या ग्राहकांना दरमहा 719 रुपये शुल्क भरावं लागेल. परंतु सोशल मीडिया तज्ञ आणि ब्रँड स्ट्रॅटेजिस्टच्या मते, भारतात ट्विटरच्या वेरिफाइड खात्यासाठी महिन्याला फी भरण्यात कोणीही रस घेत नाही. कारण त्यांना हे पैसे देणे शक्य नाही. भारतातील लोकांना व्हेरिफाईड खात्यासाठी दरमहा 719 रुपये भरण्यात स्वारस्य असणार नाही. हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व विभागांमध्ये हे एक किंमत केंद्रित म्हणजेच प्राइज सेंट्रिक मार्केट आहे आणि भारतीय लोक खर्च करण्यापूर्वी खूप काळजीपूर्वक विचार करतात. पैसे खर्च करण्यापूर्वी तो खर्च त्यांच्यासाठी उपयुक्त आहे की नाही, याची ते खात्री करतात. भारतीयांसाठी त्यांच्या ट्विटर हँडलवर कमाई करणं आणि त्यासाठी दरमहा पैसे देणं महत्त्वाचं वाटत नाही. ब्लूटिकची गरजच काय? बिझनेस आणि ब्रँड स्ट्रॅटेजी स्पेशलिस्ट हरीश बिजूर म्हणतात की लोकांनी त्यांचं हँडल कसं रिकग्नाइज करायचं, ते समजून घेतलं आहे. त्यामुळं ते ओरिजिनल वेरिफाइड स्टेटससाठी कार्य करण्यास प्राधान्य देऊ शकतात. ते म्हणाले की, सोशल मीडियावर कंटेंट खूप महत्त्वाचा असतो. खरेदी न करता निळ्या रंगाची टिक दिसली, तर लोकांचा आदर होतो. जर एखाद्यानं मासिक सबस्क्रिप्शनवर ब्लूटिक घेतली असेल, तर ते फारसे फायदेशीर ठरणार नाही. हेही वाचा: सुवर्णसंधी! अर्ध्या किमतीत मिळतोय हा’ प्रीमियम स्मार्टफोन, आत्ताच करा ऑर्डर त्याचवेळी एलॉन मस्क सांगतात की, वैयक्तिक वापराव्यतिरिक्त ट्विटर हँडल लवकरच व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी शुल्क आकारायला सुरुवात करणार आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की कालांतरानं लोकांना हे समजण्यास सुरुवात होईल की कोणतं हँडल ओरिजिनल वेरिफाइड आहे आणि कोणतं हँडल पैसे भरून वेरिफाय झालेलं आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांना क्लाउडसाठी ऑनलाइन पेमेंट करण्यात अधिक स्वारस्य आहे ,कारण त्याची स्वतःची आव्हानं आहेत आणि चुकीची माहिती टाळण्यासाठी आणि बनावट खाती काढून टाकण्यासाठी ते असे सुविधा शुल्क देऊ शकतात.
अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे नुकसान- Twitter ने 8 डॉलरचे सबस्क्रिप्शन मॉडेल रद्द केलं आहे. त्यामुळं अनेक कंपन्यांचे बनावट हँडल बनवून शुल्क भरून ती वेरिफाय केली गेली आणि त्यांच्या मदतीनं चुकीची माहिती दिली गेली. यामुळं अनेक कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका बसला आणि त्यांचं बरेचसे भांडवल एकाच दिवसात बुडालं.