spam calls
नवी दिल्ली, 18 मे : दररोज अनेकांना कंपन्यांचे स्पॅम कॉल येत असतात. कदाचित फोन वापरणारा असा एकही जण नसेल ज्याला असे कॉल येत नाहीत. याबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार जवळपास 64 टक्के भारतीयांना दररोज तीन किंवा त्याहून अधिक स्पॅम कॉल येतात. एका सोशल मीडियाच्या अहवालानुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (TRAI) डू नॉट डिस्टर्ब यादीतील 95 टक्के मोबाइल युजर्सनी त्यांच्या फोनवर सतत नको असलेले आणि त्रासदायक कॉल येत असल्याचं सांगितलं. नवीन बँक अकाउंट, लोन, इन्शुरन्स, रियल इस्टेट ऑफर, अेक वित्तीय सेवांमधून भारतीयांना स्पॅम कॉल येतात. अनेक भारतीय कॉल उचलतात, अनेक जण तो नंबर ब्लॉक करतात किंवा कॉल न करण्याचं सांगतात. असे कॉल येण्यात केवळ शहरंच नाही, तर ग्रामीण भागही सामिल आहेत. हा रिपोर्ट भारतातील 377 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या 37000 हून अधिक प्रतिक्रियांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. TRAI ने या निष्कर्षांवरुन रिपोर्ट करत सांगितलं, की लोकल सर्किलने स्पॅम कॉलसाठी दंड लागू करण्याची तीव्र गरज व्यक्त केली आणि लोकांना अशा कॉलची तक्रार करण्यास, रिपोर्ट करण्यास सक्षम होण्याचा सल्ला दिला आहे.
TRAI ला करण्यात आला रिपोर्ट - या रिपोर्टमध्ये मोबाइल सेवा पुरवठादारांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ट्रायला आणखी बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत यावर कोणताही मार्ग निघत नाही, तोपर्यंत हे असंच सुरू राहिल. ज्यावेळी या गोष्टींचे परिणाम गंभीर असतील त्यावेळीच संस्था आणि त्यांचे कॉलर्स हे प्रकरण गांभीर्याने घेतील, तोपर्यंत असंच राहिल असंही यात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, कोणताही कॉल आल्यास त्यावर तुमचे बँकिंग डिटेल्स, आधार कार्ड, पॅन कार्ड डिटेल्स देऊ नका. तुमच्या फोनवर आलेला OTP कोणाशीही शेअर करू नका. स्वस्तात लोन, किंवा इतर डिस्काउंटच्या जाळ्यात अडकू नका. यामुळे फसवणूक होऊ शकते आणि काही कळायच्या आत, सेकंदात अकाउंट रिकामं होण्याचा धोका निर्माण होतो.