मुंबई, 20 सप्टेंबर: चंदीगड विद्यापीठात ज्या पद्धतीनं मुलींचे व्हिडीओ बनवले गेले आणि नंतर ते शेअर केले गेले, ते पाहून सारा देश हादरला आहे. मुली या व्हिडिओंमुळं काळजीत आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडिया आणि इतर वेबसाइटवर शेअर तर केले गेले नाहीत ना, या विचारानं चिंताग्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर सोशल मीडिया किंवा इतर साइटवर एखादा व्हिडिओ किंवा फोटो लीक झाला असेल तर तो कसा हटवायचा, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण काय करावे?
आपल्याला Google सर्चबद्दल काही तक्रारी करायची असल्यास आपण याचा वापरू शकता. https://support.google.com/websearch/troubleshooter/3111061#ts=2889054%2C2C288909999%2C2888910T जर इमेज ब्लॉगवर शेअर झालेली असेल तर आपण हे टूल वापरू शकता. https://support.google.com/blogger/contact/private_info या सर्वांव्यतिरिक्त, सर्व सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये ‘Reporting Abuse or Misusing Pictures’ करण्याचा पर्याय देखील आहे. पॉर्न वेबसाइट्सकडेही असा पर्याय असतो आणि त्यांचा असा दावा आहे की ते तक्रारीच्या 48 तासात तो व्हिडिओ आणि फोटो हटवतात. हेही वाचा: वाय-फाय चोरीच्या उद्देशानं शिकला हॅकिंग; इन्स्टाग्राममधील बग शोधून मिळवलं 43 लाखांचं बक्षीस