नवी दिल्ली, 22 मार्च : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. मेसेज, व्हिडीओ, फाइल, व्हिडीओ-ऑडिओ कॉल, पेमेंट अशा सर्व गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने हा अतिशय पॉप्युलर मेसेजिंग App ठरतं आहे. WhatsApp वर फोटो पाठवण्याचीही सुविधा आहे. पण अनेकदा WhatsApp वर फोटो पाठवताना त्याची क्वालिटी खराब होते. त्यामुळे अनेकजण WhatsApp वरुन फोटो पाठवणं टाळतात. पण एका ट्रिकद्वारे तुम्ही ही समस्या सोडवू शकता. WhatsApp च्या सेटिंगमध्ये काही बदल करुन चांगल्या क्वालिटीचे फोटो शेअर करू शकता. त्याशिवाय आणखी एका ट्रिकचा वापर करुन तुम्ही व्हॉट्सअॅपवर चांगल्या क्वालिटीचे फोटो शेअर करू शकता.
- सर्वात आधी WhatsApp ओपन करुन Setting मध्ये बदल करा. - आता होम पेजवर उजव्या बाजूच्या टॉपला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. - त्यानंतर Setting वर क्लिक करा. - आता Storage and Data वर क्लिक करा. - इथे Photo Upload Quality चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. - आता तीन पर्याय दिसतील. त्यापैकी Auto, Best Quality आणि Data Saver पैकी Best Quality वर सिलेक्ट करा.
Documents Photo Share - WhatsApp वर चांगल्या क्वालिटीमध्ये फोटो सेंड करण्याचा हा चांगला पर्याय आहे. WhatsApp ओपन करा आणि ज्याला फोटो पाठवायचा आहे ते चॅट ओपन करा. आता खाली दिलेल्या पेपर क्लिप आयकॉनवर क्लिक करा. इथे Documents वर क्लिक करा. आता जो फोटो पाठवायचा आहे तो डॉक्युमेंटमध्ये सिलेक्ट करा. दरम्यान, Multi Device Feature च्या मदतीने युजर्स चार डिव्हाइसवर एकच WhatsApp Account वापरू शकतील. त्यासाठी फोनमध्ये अॅक्टिव्ह इंटरनेटचीही गरज नाही. आतापर्यंत WhatsApp Web किंवा WhatsApp Desktop वापरण्यासाठी युजर्सच्या फोनमध्येही अॅक्टिव्ह इंटरनेट असणं गरजेचं होतं. पण नव्या अपडेटनंतर युजर्स फोनमध्ये विना इंटरनेटही WhatsApp दुसऱ्या डिव्हाइसवर वापरू शकतात.