नवी दिल्ली, 11 मार्च : थंडीचे दिवस संपले असून आता गरमी सुरू झाली आहे. थंडीच्या दिवसात विजेचं बिल कमी येतं. तर उन्हाळ्यात तेच बिल हजारोंच्या घरात येतं. उन्हाळ्यात एसी, फ्रीज, कूलर आणि वॉशिंग मशीनचा वापर अधिक होतो. त्यामुळे बिलही अधिक येतं. त्याचा परिणाम खिशावर होतो. अशात काही टिप्स लक्षात ठेवल्यास विजेचं बिल 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. सोलर पॅनल - भारतात सोलर पॅनल चांगला पर्याय आहे. तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावता येऊ शकतो. ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु यामुळे तुमचं विजेचं बिल कमी होऊ शकतं. घरानुसार तुम्ही सोलर पॅनल बसवू शकता. एलईडी लाइट (LED Light) - LED लाइटमुळे विजेचं बिल कमी होण्यास मदत होते. आणि यामुळे उजेडही चांगला मिळतो. त्याशिवाय इतर इलेक्ट्रिक वस्तूही 5 स्टार रेटिंग असणारे वापरल्याने फायदा होतो. यामुळे विजेची बचत होण्यास मदत होते. बल्ब आणि ट्यूब लाइटऐवजी CFL पाच पटीने अधिक विजेची बचत करतं. अशात ट्यूबलाइटच्या जागी CFL चा वापर करा. ज्या रुममध्ये लाइटची गरज नाही, तिथे लाइट बंद करा. इन्फारेड सेंसर, मोशन सेंसर आणि डिमरसारख्या वस्तूंचा वापर करणं फायद्याचं ठरतं.
सीलिंग आणि टेबल फॅन - उन्हाळ्यात एसीहून अधिक सीलिंग किंवा टेबल फॅनचा वापर करा. टेबल आणि सीलिंग फॅन 30 पैसे ताशी हिशोबाने खर्च येतो. तर AC 10 रुपये ताशी हिशोबाने चालतो. एसी वापरल्यास 25 डिग्रीवर सेव्ह करा.
फ्रीजवर मायक्रोवेव्हसारख्या गोष्टी चुकूनही ठेवू नका. यामुळे विजेचा अधिक वापर होतो. फ्रीज डायरेक्ट सनलाइटपासून दूर ठेवा. फ्रीजजवळ एयरफ्लोसाठी चांगली जागा ठेवा. गरम जेवणही फ्रीजमध्ये ठेवू नका. जेवण थंड झाल्यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवा. कंप्यूटर आणि टीव्ही पॉवर बटण ऑफ करा. फोन आणि कॅमेरा चार्जर वापर केल्यानंतर प्लगमधून काढून टाका. प्लग-इन ठेवल्याने अधिक विजेचा वापर केला जातो.