JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमचं Facebook Account हॅक झाल्यास काय कराल? कसं कराल रिकव्हर, वाचा सोपी प्रोसेस

तुमचं Facebook Account हॅक झाल्यास काय कराल? कसं कराल रिकव्हर, वाचा सोपी प्रोसेस

सध्या अनेक युजर्स फेसबुकवर एका विचित्र समस्येचा सामना करत आहेत. अनेकांचं फेसबुक अकाउंट हॅक (Facebook Account Hack) होत असून त्यांच्या नावाने पैसे मागितले जात आहेत.

जाहिरात

आपलं फेसबुक प्रोफाइल (Facebook Profile) कुणी पाहिलं आहे, हे जाणून घेण्यासाठी फेसबुकने ऑप्शन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अनेक युजर्स करताना दिसतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 जुलै : सध्या अनेक युजर्स फेसबुकवर (Facebook) एका विचित्र समस्येचा सामना करत आहेत. अनेकांचं फेसबुक अकाउंट हॅक (Facebook Account Hack) होत असून त्यांच्या नावाने पैसे मागितले जात आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना याबाबत अशावेळी माहिती मिळत आहे, ज्यावेळी जाणकार व्यक्ती पैसे मागितल्याची बाब त्यांना सांगतो. त्यानंतर पैसे त्यांच्या नावाने एका दुसऱ्याच व्यक्तीने मेसेज करुन मागितले असल्याचं समजतं. तसंच जो नंबर पैसे ट्रान्सफरसाठी मागितला आहे, तोदेखील त्या व्यक्तीचा नसल्याचं समजतं. अनेकांनी ट्रान्सफर केले पैसे - दिल्लीत राहणारे जितेश श्रीवास हे व्यवसायाने इंजिनियर आहेत. त्यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची बाब तेव्हा समजली, ज्यावेळी त्यांच्या मित्राने त्यांना फोन करुन पैसे मिळाले का असा प्रश्न केला. त्यांना हा प्रश्न का विचारला हे काहीच समजलं नाही. त्यांनी मी कोणतेच पैसे मागितले नसल्याचं सांगितलं. तसंच त्या मित्राने कोणाला किती पैसे दिले याचीही विचारणा केली. समोरील मित्राने सांगितलं, की एक हजार रुपये पाठवले असून फेसबुक मेसेंजरवर तु अडचणीत असल्याचा एक मेसेज आला होता आणि पैशांची गरज असल्याचंही सांगण्यात आलं. त्यांनी ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले होते, त्यावर कॉल केल्यानंतर तो नंबर अस्तित्वात नसल्याचं आलं. जितेश यांच्याप्रमाणे असे अनेक लोक आहेत, ज्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे. अकाउंट हॅक झाल्याचं समजताच युजर्स आपल्या वॉलवर याबाबतची सूचना देत आहेत. फेसबुक पेजवर रिपोर्ट करा - फेसबुकने अशाप्रकारे अकाउंट हॅक प्रकरणांसाठी हेल्प पेज बनवलं आहे. जर तुमचं अकाउंट हॅक झाल्याचं वाटत असल्यास, या पेजवर दिलेल्या स्टेपनुसार, अकाउंट पुन्हा अॅक्टिव्हेट आणि सिक्योर करता येईल. https://hi-in.facebook.com/help/ या लिंकवर क्लिक करुन फेसबुक हेल्प पेजवर (Facebook Help Page) पोहचू शकता.

(वाचा -  Aadhaar Cardअपडेट करणं आता आणखी सोपं;हेल्पलाईनवर करा तक्रार, सोडवली जाईल समस्या )

हॅकिंग अशाप्रकारे ओळखा - - ईमेल आयडी आणि पासवर्ड बदलला असेल. - नाव आणि जन्मतारीख बदलली असेल. - अशा लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली गेली आहे, ज्यांना तुम्ही ओळखत नाही. - असे मेसेज पाठवण्यात आले, जे तुम्ही पाठवले नाहीत. - अशा पोस्ट केल्या गेल्यात, ज्या तुम्ही केल्या नाहीत. करू नका हे काम - - अकाउंट लॉगइन करताना पासवर्ड सिक्योर ठेवा. ओपन Wifi चा वापर करू नका. - फेसबुकवर जन्मतारीख टाकू नका. अनेक जण आपली जन्मतारीखच पासवर्ड ठेवतात. यामुळे हॅकर्स युजर्सचं अकाउंट हॅक करू शकतात. - मोबाईल नंबर फेसबुकवर टाकू नका. यामुळे युजरच्या सिक्योरिटीला धोका निर्माण होतो. मोबाईल नंबर ठेवला तरी त्यासाठी Only Me सेटिंगचा वापर करा, यामुळे तुमचा मोबाईल नंबर समजणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या