JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सततच्या Spam Calls चा वैताग आलाय? करा फक्त हे एक काम, बंद होतील फेक कॉल्स

सततच्या Spam Calls चा वैताग आलाय? करा फक्त हे एक काम, बंद होतील फेक कॉल्स

Spam Calls ची मोठी समस्या असून यात टेलिमार्केटिंग, बँक कार्ड तसंच अनेक फेक कॉलही असतात. फेक, Spam Calls पासून सुटका करण्यासाठी दूरसंचार विभागाने एक पर्याय दिला आहे.

जाहिरात

spam calls

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : देशभरातील जवळपास प्रत्येक मोबाइल युजरला एक सारखीच समस्या आहे, ती म्हणजे सतत येणारे स्पॅम कॉल्स. या Spam Calls मध्ये टेलिमार्केटिंग, बँक कार्ड तसंच अनेक फेक कॉलही असतात. अशा सततच्या कॉल्समुळे अनेक जण हैराण होतात. Truecaller ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, देशात मागील काही वर्षांच्या तुलनेत फेक कॉल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रिपोर्टनुसार, प्रत्येक युजरला महिन्याला सरासरी 16.8 स्पॅम कॉल्स येतात.

एक देश एक आपत्कालीन नंबर, मोबाइल नेटवर्कशिवायही या नंबरवर कॉल करून मिळेल मदत

फेक, Spam Calls पासून सुटका करण्यासाठी दूरसंचार विभागाने एक पर्याय दिला आहे. टेलिमार्केटिंग कंपन्यांच्या फोन कॉल्सपासून सुटका होण्यासाठी फोनवरुन 1909 नंबरवर एक मेसेज करावा लागेल. त्यानंतर टेलिमार्केटिंग किंवा कार्ड घेण्यासाठी येणारे सततचे कॉल येणं बंद होईल.

तुमच्या Computer वर या Virus ची नजर, केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

ट्विटरवर दूरसंचार विभागाकडे एक तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीला उत्तर देताना दूरसंचार विभागाने सांगितलं, की स्पॅम कॉल्सपासून सुटका होण्यासाठी तुमच्या नंबरवरुन 1909 वर कॉल किंवा मेसेज करुन DND सर्विस सुरू करू शकता.

संबंधित बातम्या

मोबाइल नंबरवरुनही Spam Calls येतात? TRAI च्या नियमांनुसार, कोणतीही टेलिमार्केटिंग कंपनी युजर्सना मोबाइल नंबरवरुन कॉल करत नाही. असं आढळल्यास, युजरने लगेच तक्रार करावी. पहिली तक्रार केल्यानंतर लगेच त्या नंबरच्या सर्व सेवा बंद केल्या जातात. त्याशिवाय त्या नंबरच्या मालकाचं नाव आणि पत्ता पुढील दोन वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या