JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Wifi चा पासवर्ड विसरलात? या सोप्या टिप्स वापरा आणि झटपट मिळवा

Wifi चा पासवर्ड विसरलात? या सोप्या टिप्स वापरा आणि झटपट मिळवा

How to Find Wi-Fi password: कधी कधी आपण WiFi चा पासवर्ड विसरतो. अशा स्थितीत, जेव्हाही दुसर्‍या फोनमध्ये पासवर्ड ऑन करावा लागतो, तेव्हा खूप त्रास होतो. पण आता फोन आणि लॅपटॉपमध्ये वायफाय पासवर्ड पाहणं खूप सोपं झालं आहे.

जाहिरात

Wifi चा पासवर्ड विसरलात? या सोप्या टिप्स वापरा आणि झटपट मिळवा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑगस्ट: आजकाल प्रत्येक व्यक्ती इंटरनेट वापरत आहे. काहीजण फोनमध्ये इंटरनेट पॅक लावून वापरतात तर काही घरात वायफाय लावून. अलीकडच्या काळात वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करण्याची पद्धत सुरु झाली आहे. त्यामुंळं अनेक लोक घरून काम करण्यास प्राधान्य देतात. घरून काम करण्यासाठी अनेकजण वायफाय स्थापित करतात. एकदा वायफाय फोन आणि लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्यानंतर पुन्हा पुन्हा तपासण्याची गरज पडत नाही. नेमकं याच कारणामुळं अनेक वेळा लोक वायफायचा पासवर्ड विसरतात. आता जेव्हा दुसर्‍या एखादा फोन किंवा लॅपटॉपला वायफाय कनेक्ट करण्याची वेळ येतं, अशावेळी पासवर्ड टाकावा लागतो आणि नेमकं तेव्हाच पासवर्ड आठवत नाही आणि मोठी अडचण होते. आज आम्ही तुम्हाला असे मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही वायफायचा पासवर्ड सहज तपासू शकता आणि बदलू शकता. स्टेप 1: लॅपटॉपला वायफायने कनेक्ट करा. स्टेप 2: यानंतर टास्कबारमधील वायफाय नेटवर्कच्या चिन्हावर उजवं क्लिक (right click) करा. तेथे ‘ओपन नेटवर्क आणि शेअरिंग सेंटर’ वर क्लिक करा. स्टेप 3: अ‍ॅडॉप्टर सेटिंग बदला वर क्लिक करा. स्टेप 4: त्यावर क्लिक केल्यानंतर अनेक नेटवर्क दिसतील. तुमच्या वायफाय नेटवर्कवर राईट क्लिक करा आणि नंतर स्टेटस वर क्लिक करा. हेही वाचा-  Facebook अन् Instagram तुमच्यावर लक्ष ठेवतात? संपूर्ण सत्य काय आहे, वाचा सविस्तर स्टेप 5: पाचव्या पायरीमध्ये, वायरलेस प्रॉपर्टीजवर क्लिक करा. आणि नंतर Security वर क्लिक करा. स्टेप 6: येथे नेटवर्क सुरक्षा की दिसेल. तिथेच WiFi पासवर्ड असतो. जर पासवर्ड लपविला असेल तर show character वर क्लिक करा. तुम्हाला पासवर्ड समोर दिसेल. फोनमधील वायफाय पासवर्ड कसा जाणून घ्यावा- स्टेप 1: फोनमधील WiFi पासवर्ड जाणून घेण्यासाठी ES File Explorer Device Manager इंस्टॉल करा. स्टेप 2: डिव्हाइस स्टोरेजमध्ये ES File Explorer उघडा. स्टेप 3: यानंतर डेटा नावाचा फोल्डर उघडा आणि नंतर Misc नावाचा फोल्डर उघडा. स्टेप 4: यानंतर वायफाय फोल्डर ओपन करा. स्टेप 5: WiFi फोल्डरमध्ये wpa_suppicant.cofig नावाची फाइल असेल, ती ES फाइल एक्सप्लोररने उघडा. तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या