नवी दिल्ली, 7 डिसेंबर : अनेक आर्थिक सेवांपासून आयकर रिटर्न दाखल करण्यापर्यंत पॅन कार्डचा वापर केला जातो. पॅन कार्ड अतिशय महत्त्वपूर्ण कागदपत्र असून, 50 हजारांहून अधिकच्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचं ठरतं. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, कार खरेदीवेळी पॅन कार्ड कॉपी मागितली जाते. परंतु अनेकदा प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची फिजिकल कॉपी घेऊन जाणं शक्य होत नाही. अनेकदा पॅन कार्ड हरवण्याचेही प्रकार घडतात. पॅन कार्ड नसल्यास अनेक कामं अडकू शकतात. त्यामुळे पॅन कार्डची ई-कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी मोबाइलवर डाउनलोड करणं अतिशय फायद्याचं ठरतं. e-PAN Card डाउनलोड करणं सर्वात चांगला पर्याय ठरतो. हे पॅन कार्ड मोबाइल, मेल, क्लाउड स्टोरेजवर सेव्ह करता येतं. यामुळे फिजिकल कॉपी जवळ सांभाळण्याची गरज नाही. फिजिकल पॅन कार्ड तुमच्या घरात सुरक्षित राहतं. पॅन कार्ड हरवलं तरीही ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन प्रक्रिया केवळ 10 मिनिटांत पूर्ण होते. यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आधार कार्डची गरज असते.
- सर्वात आधी http://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वेबसाइटवर जा. - त्यानंतर डाउनलोड ई-पॅन या पर्यायावर क्लिक करा. - इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकण्यासाठी सांगितलं जाईल. - पुढे आधार क्रमांक द्यावा लागेल. - त्यानंतर जन्मतारीख टाकावी लागेल. पुढे नियम आणि अटी स्वीकाराव्या लागतील. - अटी आणि नियम स्वीकारल्यानंतर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकून पुढील प्रोसेस करा. - आता पेमेंट करण्यासाठीचा पर्याय पॉप-अप होईल. 8.26 रुपये पेमेंट करावं लागेल. हे पेमेंट UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने करता येतं. - पेमेंट पूर्ण झाल्यानंतर e-PAN Card डाउनलोड करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे पॅन कार्डची PDF फाइल पासवर्डने सुरक्षित असेल. हा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.