नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स ओपन असतात. त्यामुळे फोन हरवला तर मोठी समस्या निर्माण होते. फोनमध्ये ऑनलाइन पेमेंटसाठी Paytm चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशात फोन हरवला तर अकाउंट ओपन राहून त्याचा चुकीचा वापर होण्याची भीती असते. परंतु फोन हरवल्यानंतरही काही महत्त्वपूर्ण स्टेप्स फॉलो करुन तुम्ही Paytm Account दुसऱ्या व्यक्तीकडून अनलॉक होण्यापासून वाचवू शकता. हरवलेल्या फोनमधून पेटीएम बंद करण्यासाठी अनेक पद्धती आहे. तुम्ही रिमोटली डिजिटल पेमेंट अकाउंटला रिमूव्ह किंवा ब्लॉक करू शकता.
Paytm युजर्स सहजपणे सर्व डिव्हाइसमधून अकाउंट लॉगआउट करू शकतात. यासाठी तुम्हाला अकाउंटचा पासवर्ड आणि रजिस्टर्ड मोबाइल माहित असणं गरजेचं आहे. - सर्वात आधी Paytm App एखाद्या सेकंडरी मोबाइलवर डाउनलोड करा. - त्यानंतर मेन्यूमध्ये जा. इथे वरच्या डाव्या बाजूला स्क्रिन दिसेल. यात प्रोफाइल सेटिंग टॅबमध्ये जावं लागेल. - त्यानंतर सिक्योरिटी आणि प्रायव्हसी सेटिंगमध्ये जावं लागेल. - त्यापुढे मॅनेज अकाउंट ऑन ऑल डिव्हाइस ऑप्शनवर जावं लागेल. - इथे टॅप केल्यानंतर एक मेसेज दिसेल. त्यात सर्व डिव्हाइसमधून लॉगआउट करण्यासाठी कन्फर्मेशन दिसेल. त्यावर Yess करा.
त्याशिवाय Paytm हेल्पलाइन नंबर 01204456456 वर तक्रार करू शकता. इथे अनेक पर्याय मिळतील. त्यापैकी Lost Phone पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर इथे दुसरा नंबर द्यावा लागेल. आवश्यक ती माहिती दिल्यानंतर सर्व डिव्हाइसमधून Paytm Account लॉगआउट करता येईल.