तुमच्या पॅन कार्डची हिस्ट्री चेक करण्यासाठी सर्वात आधी https://www.cibil.com/ वर जा.
नवी दिल्ली, 27 मार्च : पॅन कार्ड (PAN Card) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. अनेक सरकारी कामांसाठी पॅन कार्डची गरज लागते. परंतु पॅन कार्डचा चुकीचा वापर आणि डुप्लिकेट पॅनसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. खोटं, डुप्लिकेट पॅन कार्ड वापरुन फ्रॉड केल्याच्या अनेक घटना समोर आहेत. त्यामुळे एखाद्याचं पॅन कार्ड खरं की खोटं हे पाहणं अतिशय गरजेचं ठरतं. हेच पाहता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पॅन कार्ड्ससह QR Code आणला आहे. जुलै 2018 नंतर सर्व पॅन कार्डमध्ये यूनिक क्यूआर कोड मिळतो. यात टॅक्स भरणाऱ्यांचे डिटेल्स असतात. पॅन कार्डच्या पुढच्या बाजूला क्यूआर कोड असतो त्यात फोटो, सही, नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचं नाव, असे डिटेल्स असतात. हा QR Code पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी एका App ची गरज लागते. या App चं नाव Enhanced PAN QR Code Reader असून हे गुगल प्ले स्टोरवरही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही डाउनलोड केलेलं App NSDL e-Governance Infrastructure Limited ने डेव्हलप केलेलं App असावं. या App च्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनचा वापर करुन पॅन कार्डवर प्रिंट असलेला क्यूआर कोड स्कॅन करू शकता. हे तुमचे डिटेल्स वेरिफाय करेल आणि पॅन कार्डसंबंधी रियल टाइम डिटेल्स देईल.
कसं वापरता येईल App? सर्वात आधी Google Play Store वर Enhanced PAN QR Code Reader App डाउनलोड करा. आता Next वर क्लिक करा. त्यानंतर कॅमेराप्रमाणे व्ह्यू फाइंडर ओपन होईल आणि स्क्रिनवर ग्रीन डॉट दिसेल. पॅन कार्ड चेक करण्यासाठी कॅमेरा PAN QR वर घेऊन जा. ग्रीन डॉट सेंटरवर ठेवल्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन झाल्यानंतर युजरला पॅन कार्डसंबंधी सर्व डिटेल्स मिळतील. याद्वारे तुम्ही पॅन कार्ड खरं की खोटं हे तपासू शकता.
हे App वापरण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा कमीत-कमी 12 मेगापिक्सलचा ऑटोफोकससह असणं गरजेचं आहे. फ्लॅश किंवा लाइट रिफ्लेक्शन येऊ देऊ नये. यामुळे क्यूआर कोड स्कॅन होण्यास वेळ लागेल.