नवी दिल्ली, 26 डिसेंबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp वर फोटो, ऑडिओ, व्हिडीओ, फाइल्स, कॉल्स अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने याची लोकप्रियता मोठी आहे. त्याशिवाय आता WhatsApp ने WhatsApp Pay चा पर्यायही दिला आहे. त्यामुळे WhatsApp द्वारे पैसेही पाठवता येण्याची सुविधा आहे. तसंच तुमच्या Bank Account चा Bank Balance ही तपासता येणार आहे. WhatsApp Payments नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासह (NPCI) भागीदारीत डेव्हलप करण्यात आलं आहे. तसंच हे 227 हून अधिक बँकांसह भागीदारीत रियल-टाइम पेमेंट सिस्टमची सुविधा देतं. या फीचरमुळे पैसे मिळण्याची आणि पाठवण्याची सोपी सुविधा दिली जाते. तसंच बँक अकाउंट बॅलेन्सही चेक करण्याची सुविधा मिळते. WhatsApp द्वारे बँक अकाउंट बॅलेन्स चेक करण्याच्या दोन पद्धती आहेत. App वर सेटिंग सेक्शनमधून बॅलेन्स चेक करू शकता किंवा पैसे पाठवताना पेमेंट स्क्रिन पाहू शकता.
App Setting द्वारे असा तपासा बँक बॅलेन्स - - WhatsApp ओपन करा. - Android फोन असल्यास More ऑप्शनवर टॅप करा. iPhone असल्यास Setting वर टॅप करा. - आता Payments वर क्लिक करा. - पेमेंट मेथडअंतर्गत संबंधित बँक अकाउंटवर टॅप करा. - इथे View Account Balance वर टॅप करा आणि UPI PIN टाका.
पैसे पाठवताना तपासा बँक बॅलेन्स - - पेमेंट मेसेज स्क्रिनवरुन आपल्या उपलब्ध पेमेंट मेथडवर टॅप करा. - View Account Balance वर टॅप करा. - जर तुमच्या WhatsApp Account शी अनेक बँक अकाउंट जोडलेले असतील, तर संबंधित बँक अकाउंटची निवड करा. - आता UPI PIN टाका.