JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Aadhaar Card मध्ये जन्मतारीख चुकल्यास खोळंबतील महत्त्वाची कामं, घरबसल्या अशाप्रकारे करा अपडेट

Aadhaar Card मध्ये जन्मतारीख चुकल्यास खोळंबतील महत्त्वाची कामं, घरबसल्या अशाप्रकारे करा अपडेट

आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असल्यास मोठी समस्या येऊ शकते. त्यामुळे ती अपडेट करणं गरजेचं आहे. चुकीची जन्मतारीख काही सोप्या स्पेप्सद्वारे घरबसल्या अपडेट करता येईल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारी, खासगी सर्वच कामांसाठी आधार कार्ड गरजेचं आहे. त्यामुळे आधार कार्ड नेहमी अपडेट असणं, त्यावरील माहिती योग्य असणं आवश्यक आहे. आधार कार्डवरील फोटो, मोबाइल नंबर अपडेट करता येतो. तुमच्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख चुकीची (Aadhaar Card Date of Birth Update) आली असल्यास तीदेखील अपडेट करता येईल. आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असल्यास मोठी समस्या येऊ शकते. त्यामुळे ती अपडेट करणं गरजेचं आहे. चुकीची जन्मतारीख काही सोप्या स्पेप्सद्वारे घरबसल्या अपडेट करता येईल. जन्मतारीख अपडेट करण्यासाठी आधार सेंटरला न जाता काही मिनिटांत हे लॅपटॉप, स्मार्टफोनवर अपडेट करता येईल.

हे वाचा -  PAN-Aadhaar लिंक करण्यास समस्या येतेय? जाणून घ्या काय असतील कारणं, अशी होईल मदत

जन्मतारीख ऑनलाइन कशी अपडेट कराल? - सर्वात आधी UIDAI वेबसाइट ssup.uidai.gov.in वर क्लिक करा. - त्यानंतर स्क्रोल करुन Update Aadhaar सेक्शनमध्ये जा. इथे Update Demographics Data and Check Status पर्यायावर क्लिक करा. - त्यानंतर 12 अंकी आधार नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा कोड वेरिफिकेशन पूर्ण करा आणि Send OTP वर क्लिक करा. - आता रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल, तो भरा. - त्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारीख अपडेट करण्यासाठी Update Aadhaar वर क्लिक करा. - आता Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा. - इथे जन्मतारीख अपडेट करण्याचासाठी पर्याय दिसेल. यासाठी काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक (Mobile Number Link to Aadhaar) असणं आवश्यक आहे.

हे वाचा -  तुमच्या एकाच मोबाइल नंबरवरुन तयार होईल संपूर्ण कुटुंबाचं Aadhaar PVC Card, असा करा अर्ज

दरम्यान, अनेकजण आपल्या सोबत आधार कार्ड बाळगतात. अनेकदा ते फाटण्याची, खराब होण्याची भीती असते. यासाठी प्लास्टिकचं पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) फायद्याचं ठरतं. तुम्ही सहजपणे PVC Aadhaar Card बनवू शकता. प्लास्टिक आधार कार्ड खराब होत नाही. तुम्ही केवळ एका मोबाइल नंबरवरुन आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी PVC आधार कार्ड अर्ज करू शकता. PVC Aadhaar Card साठी myaadhaar.uidai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या