नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : डिजीटल युगाने अनेक सुविधा दिल्या आहेत. सध्या अनेक जण ऑनलाइन पेमेंट करुन खरेदी करतात. पैसे ट्रान्सफर करण्यासाठीही Payment Apps आणि Online Banking चा उपयोग केला जातो. कोरोना काळात Digital transaction मध्ये मोठी वाढ झाली आहे. पेमेंट सिस्टम कंपनी ACI world-wide रिपोर्टनुसार, 2025 पर्यंत भारतात डिजीटल ट्रान्झेक्शनचा वापर 71 टक्क्यांहून अधिक होईल. मोठ्या मॉल, दुकानांपासून ते चहाच्या टपरीपर्यंत QR Code स्कॅन करुन पेमेंट केलं जातं. एकीकडे डिजीटल ट्रान्झेक्शन वाढत असताना, दुसरीकडे फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. सध्या फेस्टिव्ह सीजनमध्ये ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी वाढ झाली असून अनेक जण डिजीटल पेमेंटचा वापर करत आहेत. परंतु ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घेणं, सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
QR codes scanning - QR code द्वारे ऑनलाइन पेमेंट करताना कोणीही पाठवलेल्या कोडवर स्कॅन करू नका. पैसे ट्रान्सफर करताना, त्या व्यक्तीचा फोन नंबर किंवा UPI ID वापरणं फायद्याचं ठरेल. यामुळे संपूर्ण ट्रान्झेक्शन सेफ आणि कंट्रोलमध्ये राहील. Unknown Link - फोनवर आलेला एखादा ईमेल, लॉटरी जिंकण्याचा मेसेज, क्रेडिट कार्ड खरेदीचा मेसेज, बँक अकाउंट किंवा सिम कार्ड ब्लॉक होण्याचा मेसेज, KYC अपडेट मेसेज आल्यास सावध राहा. अशा मेजेसमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. TrueCaller - फोनवर अनेकदा बँकेतून, कोणत्याही कंपनीकडून कॉल येत असतात. असे नंबर्स ओळखण्यासाठी फोनमध्ये TrueCaller चा वापर करणं गरजेचं आहे. असा कोणताही कॉल आला, तर TrueCaller मध्ये Fraud किंवा स्पॅम असं लाल बॉक्समध्ये लिहून येईल. असा कॉल तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता.
Apps डाउनलोड - आपल्या फोनमध्ये अनेक Apps आहेत. परंतु कोणतंही App डाउनलोड करताना, त्याची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. App डाउनलोड करताना डेव्हलपरबाबत माहिती घ्या. App चं रेटिंग तपासणंही गरजेचं आहे. ऑफिशियल स्त्रोतद्वारेच App डाउनलोड करा.