नवी दिल्ली, 14 डिसेंबर : तुम्ही कोणतंही सिम कार्ड वापरत असाल, तरी Airtel, Jio, VI अशा सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या सततच्या कॉल्सने अनेक जण हैराण होतात. कंपन्या कॉल करुन ऑफर्सची माहिती, त्याशिवाय प्लॅन वॅलिडिटी संपल्यानंतर त्याबाबतची माहिती देण्यासाठी सतत मेसेज आणि कॉल करत असतात. तसंच इतरही कारणांसाठी कंपन्यांचे सतत कॉल येत असल्याच्या ग्राहकांच्या अनेक तक्रारी असतात. टेलिकॉम कंपन्यांच्या सततच्या कॉल आणि मेसेजने अनेक जण हैराण होतात. परंतु हे सततचे येणारे फोन-मेसेजेस कसे बंद करायचे याबाबत अनेकांना माहित नसते. परंतु या नको असलेल्या कॉल्सपासून सुटका करता येऊ शकते. तुम्ही तुमच्या नंबरसाठी DND अर्थात Do Not Disturb सर्विस इनेबल करू शकता. ही प्रोसेस TRAI ने सर्व नेटवर्क ऑपरेटर युजर्ससाठी सोपी केली आहे. DND इनेबल करण्यासाठी दोन पद्धती आहेत. फोन कॉल करुन किंवा SMS करुन DND अॅक्टिवेट करू शकता. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे DND सर्विस अॅक्टिवेट केल्यानंतर कंपनीच्या नव्या ऑफर्सची किंवा इतर बाबींची माहिती मेसेज किंवा कॉलद्वारे मिळणार नाही.
SMS द्वारे असं करा इनेबल - जर तुम्हाला DND सर्विस इनेबल करायची असेल, तर यासाठी फोनच्या मेसेजिंग App मध्ये START 0 लिहावं लागेल आणि हा मेसेज 1909 नंबरवर सेंड करावा लागेल.
या नंबर कॉल करुन अॅक्टिवेट करा DND सर्विस - फोनद्वारे DND सर्विस अॅक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला ज्या नंबरसाठी DND अॅक्टिवेट करायचं आहे, त्या नंबरवरुन 1909 वर कॉल करा. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शक तत्वं फॉलो करुन नंबरसाठी DND सर्विस इनेबल करता येईल.