JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुम्हीही Truecaller अ‍ॅप वापरता का? डेटा सुरक्षिततेबाबत कंपनीने काय सांगितलं...

तुम्हीही Truecaller अ‍ॅप वापरता का? डेटा सुरक्षिततेबाबत कंपनीने काय सांगितलं...

डेटा लोकलायझेशन आणि नको असलेला डेटा काढून टाकण्याचं काम कंपनी करत असून, आता ते प्रत्यक्ष दिसून येतंय, असं ट्रु कॉलरचे भारतातील मुख्य उत्पादन अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी झुनझुनवाला यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12  सप्टेंबर : दिवसभरात अनेक अनोखळी क्रमांकांवरून मोबाइलवर कॉल येतात, असा तुमचाही अनुभव असेल. अशावेळी आपल्याला येणारा फोन कुणाचा आहे याची माहिती देणाऱ्या (Caller Identification) ट्रु कॉलर या अ‍ॅपची (True Caller) अनेकांना मदत होते. डेटा सुरक्षेच्या (Data Security) बाबतीत असलेल्या सर्व नियमांचं भारतासह इतर देशांतही पालन केलं जात असल्याचं स्वीडनच्या ट्रु कॉलर कंपनीनं म्हटलं आहे. डेटा लोकलायझेशन आणि नको असलेला डेटा काढून टाकण्याचं काम कंपनी करत असून, आता ते प्रत्यक्ष दिसून येतंय, असं ट्रु कॉलरचे भारतातील मुख्य उत्पादन अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी झुनझुनवाला यांनी म्हटलं आहे.

झुनझुनवाला म्हणाले की, डेटाची गोपनीयता (Data Privacy) आणि अ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी डेटा सुरक्षा (Data Security) देण्याच्या दृष्टीने आम्ही कटीबद्ध आहोत. कंपनीने स्वत:हून डेटा लोकलायझेशनसंबंधी वेगाने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी असलेले नियम, अटी आणि गोपनीयतेचं धोरण लपून राहिलेलं नाही. मागील काही वर्षांत उत्तम संवाद ठेवण्यात कंपनी यशस्वी ठरली असून, ट्रुकॉलरबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यातही कंपनीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूर्वीच्या तुलनेत कंपनीबद्दल असलेली धारणा बदलली असल्याचं झुनझुनवाला म्हणाले.

कंपनीचा डेटा आधीपासूनच सुरक्षित

सरकारच्या वतीनं डेटा संरक्षण विधेयकाचा मसुदा (Data Protection Bill Draft) नुकताच मागे घेण्यात आला. तसंच यासाठी नवीन नियम व धोरणांवर आधारित व्यापक योजना तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात बोलताना झुनझुनवाला म्हणाले की, भारतात तसंच कंपनीकडून चालवल्या जाणाऱ्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये डेटा संरक्षणाच्या सर्व नियमांना नेहमी प्रथम प्राधान्य दिलं जातं. भारतात डेटा सुरक्षा विधेयक मागे घेतलं आहे. प्रसारमाध्यमातील बातम्यांनुसार, लवकरच नवीन विधेयक तयार करण्यात येईल. वास्तविक पाहता कंपनीकडून अनेक वर्षांपूर्वीच भारतीय अ‍ॅप वापरकर्त्यांच्या डेटाचे 100 टक्के लोकलायझेशन केलेलं आहे. वापरकर्त्यांना सर्वोत्तम गोपनीयतेची सुविधा आणि स्पॅम सुरक्षा (Spam Security) देण्यासाठी नवीन विधेयकाच्या अन्य तरतुदींचेही पालन करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलंय. जागतिक स्तरावर कंपनी जवळपास 350 जणांना रोजगार उपलब्ध करून देते. यात बहुतांश लोक भारतीय असल्याचं झुनझुनवाला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर युजर्सचा डेटा सुरक्षित नसल्याची बाब वेळोवेळी उघड झालेली आहे. या संदर्भात अनेकांनी सोशल मीडियातील कंपन्यांवर आरोपही लावले आहेत. अशा परिस्थितीत भारतात मोबाइल युजरकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या ट्रू कॉलरच्या सुरक्षेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. परंतु, कंपनीने वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असल्याचं सांगून त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा एकप्रकारे प्रयत्नच केला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या