JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्याबाबत Facebook कडे किती आणि काय माहिती आहे? तपासण्यासाठी करा हे काम

तुमच्याबाबत Facebook कडे किती आणि काय माहिती आहे? तपासण्यासाठी करा हे काम

फेसबुक युजरचा सर्च रिझल्ट आपल्या अल्गोरिदममध्ये सेव्ह करतो आणि त्यानुसार जाहिराती दाखवतो. एवढंच नाही, तर फेसबुकचं आर्टिफिशियल इंटेलिजेंन्स टूल (AI Tool) युजरच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवतो, जेणेकरुन तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे समजू शकेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे : स्मार्टफोनमध्येच (Smartphone) अनेक युजर्स फेसबुकचा (Facebook) वापर करतात. स्मार्टफोनवर फेसबुक वापरण्यासाठी फेसबुक अ‍ॅप (Facebook App) इन्स्टॉल करावं लागतं. या इन्स्टॉलेशनवेळी अ‍ॅप युजर्सकडून अनेक परमिशन्स मागतं, ज्यात फोटो गॅलरी, कॅमेरा, मायक्रोफोन, स्पीकर आणि लोकेशनसह अनेक गोष्टींचा अ‍ॅक्सेस घेतला जातो. फेसबुकला तुमच्याबाबत किती माहिती आहे? फेसबुकला प्रत्येक युजरबाबत अनेक गोष्टींची माहिती असते. युजरचा इंटरेस्ट कशात आहे, ते काय पाहू इच्छितात, वय काय आहे, वाढदिवस, युजरकडून कोणतं डिव्हाईस वापरलं जातंय या आणि इतर अनेक गोष्टींची फेसबुकला माहिती असते. फेसबुककडे कोण-कोणती माहिती स्टोर आहे याची तुम्ही माहिती घेऊ शकता. यासाठी सर्वात आधी फोन किंवा लॅपटॉपवर फेसबुक पेज ओपन करा. आता सेटिंग्जमध्ये ‘Ads’ वर क्लिक करा. येथे युजरचा इंटरेस्ट आणि जाहिरातीसह अनेक गोष्टींची माहिती असते. युजरला कोणती पोस्ट आवडली, कोणत्या प्रोडक्टची लिंक ओपन केली हे सर्व दिसेल. युजर सेटिंग्जमध्ये बदलही करू शकतो आणि अशा प्रकारच्या जाहिराती बंद करू शकतो. तसंच जाहिरांतींसह इन्ट्रेक्शन कोण पाहू शकतं, हेदेखील कंट्रोल करू शकतो.

(वाचा -  या राज्यात दारुची ऑनलाईन डिलीव्हरी सुरू होताच ऑर्डर्सचा भडीमार,तासाभरात Appक्रॅश )

फेसबुक युजरचा सर्च रिझल्ट आपल्या अल्गोरिदममध्ये सेव्ह करतो आणि त्यानुसार जाहिराती दाखवतो. एवढंच नाही, तर फेसबुकचं आर्टिफिशियल इंटेलिजेंन्स टूल (AI Tool) युजरच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवतो, जेणेकरुन तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे समजू शकेल. जर तुम्ही गुगलवर एखादा मूव्ही सर्च करत असाल, तर फेसबुक काही वेळाने तुम्हाला जाहिरातीमध्ये मूव्ही सजेस्ट करेल.

(वाचा -  आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर )

Facebook च्या ‘Security and Login’ पेजमध्ये तुम्ही कोणत्या मोबाईल फोनवर आणि कोणत्या कम्प्यूटरवर लॉगइन आहात हे दाखवलं जातं. तसंच तुमच्या आधीच्या डिव्हाईसने कुठून लॉगइन केलं, तुम्ही कोणत्या ठिकाणी गेलात, तुमचं ऑफिस कुठे आहे, या सर्व गोष्टींची माहिती फेसबुककडे असते.

(वाचा -  इंटरनेटशिवाय वापरा WhatsApp! जाणून घ्या या नव्या फीचरबाबत )

फेसबुकच्या ‘एक्सप्लोर’मध्ये ‘On This Day’ ऑप्शनवर टॅप केल्यास, तुम्ही वर्षापूर्वी काय करत होतात, हे दाखवलं जाईल. भलेही तुम्ही याबाबत कोणतीही पोस्ट केली नसेल. फेसबुक त्या युजर्सचीही माहिती स्टोर करतं, ज्यांनी तुम्हाला लोकेशन, फोटो आणि इतर काही गोष्टींमध्ये टॅग केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या