JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Home Security Tips: जास्त काळासाठी बाहेर जाताय? या टेक हॅकच्या मदतीनं घर करा सुरक्षित

Home Security Tips: जास्त काळासाठी बाहेर जाताय? या टेक हॅकच्या मदतीनं घर करा सुरक्षित

IoT उपकरणांच्या मदतीनं तुम्ही तुमचं घर सुरक्षित ठेवू शकता. तुम्ही जगात कुठंही असलात तरी, तुम्ही कुठूनही ही उपकरणं नियंत्रित करू शकता आणि कोणत्याही काळजीशिवाय तुमच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता.

जाहिरात

Home Security Tips: जास्त काळासाठी बाहेर जाताय? या टेक हॅकच्या मदतीनं घर करा सुरक्षित

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 सप्टेंबर: अनेकवेळा असं घडते की आपण बराच काळ घरापासून दूर जातो. कधी सुट्टीसाठी तर कधी कामाच्या संदर्भात. अशा वेळी अनेक वेळा बाहेर गेल्यावरही आपलं पूर्ण लक्ष घराकडं असतं. आपलं घर, घरात ठेवलेल्या वस्तू सुरक्षित राहतील की नाही याची आपल्याला नेहमी काळजी असते. तुम्ही कुठेही जाल, तुमची फ्लाइट, हॉटेल, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि अगदी तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेता. अशा परिस्थितीत आपल्या घराचीही तशीच काळजी घेणं आवश्यक असतं. आजच्या काळात तंत्रज्ञानामुळं हा ताण कमी होऊ शकतो. IoT उपकरणांच्या मदतीनं तुम्ही तुमचं घर सुरक्षित ठेवू शकता. तुम्ही जगात कुठंही असलात तरी, तुम्ही कुठूनही ही उपकरणं नियंत्रित करू शकता आणि कोणत्याही काळजीशिवाय तुमच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता. IoT उपकरणांमुळं तुमचं रिकामं आहे हे कोणत्याही गुन्हेगाराला कळणार नाही. स्मार्ट लाइट- हे उपकरण तुमच्या घरातील वायफाय राउटरशी कनेक्ट होतं. तुम्ही ते कुठूनही नियंत्रित करू शकता. याच्या मदतीनं तुम्ही हवे तेव्हा लाईट चालू आणि बंद करू शकता. व्हॉइस असिस्टंट आणि स्मार्ट हब- व्हॉईस असिस्टंट आणि स्मार्ट हब तुम्ही प्रवास करत असताना तुमच्या घरातील उपकरणं नियंत्रित करण्यासाठी उत्तम रिमोट कंट्रोल असू शकतात. याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या घरातील उपकरणं नियंत्रित करू शकता आणि रुटीन देखील सेट करू शकता. स्मार्ट टाइमर- हा एक स्मार्ट प्लग आहे, जो डिव्हाइस चालू आणि बंद करण्यासाठी आणि त्याचं शेड्यूल करण्यासाठी वापरला जातो. TV मिमिक्स- हे उपकरण टीव्हीसारखं आहे. टीव्हीची नक्कल करण्यासाठी या गॅझेटमध्ये रंगीत एलईडी लाईट्सचा एक पॅटर्न असतो. ऑनलाइन स्टेटस टाकताना घ्या काळजी - तुम्ही जेव्हाही प्रवास करता तेव्हा तुम्ही खूप उत्साही असता आणि त्यामुळं तुम्ही तुमचे अनुभव सोशल मीडिया साइटवर शेअर करत असता. जर तुम्हाला काही ऑनलाइन शेअर करायचं असेल तर तुम्ही किमान तुमचा प्रवास संपेपर्यंत थांबावं किंवा तुम्ही संरक्षण देऊन हे फोटो आणि तपशील तुमच्या विश्वासू मित्र आणि कुटुंबियांसोबत ऑनलाइन शेअर करू शकता. असं केल्यानं, आपण घरी आहेकिंवा इतर ठिकाणी आहे, याची माहिती कोणालाही उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळं आपल्याला घर सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. हेही वाचा-  Two Wheeler Loan Tips: दुचाकीसाठी कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर होईल नुकसान व्हिडिओ डोअरबेल स्थापित करा- रिंग, गुगल नेस्ट सारखी व्हिडिओ डोअरबेल उपकरणं तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यांशी संवाद साधण्याची परवानगी देतात, मग ते मित्र असोत, कुटुंब असो किंवा कर्मचारी असोत. कोणीही बेल दाबताच तुमच्या फोनवर एक सूचना येते आणि तुम्ही रिअल टाइम रेकॉर्डिंग घेऊ शकता आणि त्यांच्याशी थेट बोलू शकता. असं केल्यानं किंवा आपण घरी नसल्याचं कळण्यापासून कोणालाही वाचवतं. स्मार्ट सुरक्षा कॅमेरा- जेव्हा तुम्ही बाहेरगावी प्रवास करत असाल तेव्हा घराला एक स्मार्ट सुरक्षा व्यवस्था हवी. तुम्ही एक विंडो मोशन सेन्सर, एक व्हिडिओ डोअरबेल आणि 1,2 कॅमेरे बाहेरच्या ठिकाणी कनेक्ट करू शकता आणि त्यांना WiFi वर एकत्र कनेक्ट करू शकता. असं केल्यानं तुम्ही इंटरनेटच्या मदतीनं संपूर्ण घरावर लक्ष ठेवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या