JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Samsung चा 1 लाखाचा फोन 7,417 रुपयांत घरी आणा, Flipkart ची जबरदस्त ऑफर

Samsung चा 1 लाखाचा फोन 7,417 रुपयांत घरी आणा, Flipkart ची जबरदस्त ऑफर

Galaxy Z Flip3 5G एक लाख रुपयांऐवजी EMI वर फक्त 7,417 रुपयांमध्ये घरी आणू शकता. हा सेल 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या फ्लिपकार्टवर (Flipkart) एकापाठोपाठ एक सेल जाहीर होत आहेत. आता 16 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Days) सुरू झाला आहे. या सेलमध्ये मोबाइल, टॅबलेट, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर काही खास ऑफर्स मिळणार आहेत. याआधी तुम्ही फ्लिपकार्टवरच्या सेलचा फायदा घेऊ शकला नसाल, तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. या सेलमध्ये तुम्ही Galaxy Z Flip3 5G एक लाख रुपयांऐवजी EMI वर फक्त 7,417 रुपयांमध्ये घरी आणू शकता. हा सेल 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. Samsung च्या या Galaxy Z Flip3 5G स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. हा फोन 5G स्मार्टफोन असून, यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1000 जीबीपर्यंत वाढवणं शक्य आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसंच 6.7-इंच फुल एचडी + डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युएल 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा दिला गेला आहे. यातला एक वाइड कॅमेरा आणि एक अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. यात दोन्ही सेन्सर 12MP चे असून, फ्रंट कॅमेरा 10MP चा आहे. तसंच या फोनमध्ये 3300mAh ची बॅटरी आहे. स्मार्टफोनसाठी एका वर्षाची, तर अॅक्सेसरीजना सहा महिन्यांची वॉरंटी मिळेल.

अत्यंत स्वस्तात मिळत आहे 2021 चा फ्लॅगशिप स्मार्टफोन! मिळणार 8GB पर्यंत RAM

Samsung च्या Galaxy Z Flip3 5G स्मार्टफोनची बाजारात किंमत 99,999 हजार रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर (Flipkart) या स्मार्टफोनसाठी 11 टक्के सवलत मिळत आहे. त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 99,999 नाही तर 88,999 रुपये द्यावे लागतील. EMI वर फक्त 7417 मध्येच तुम्ही हा फोन घरी आणू शकाल. या फोनवर नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय आहे. त्यामुळे पुढचं वर्षभर प्रत्येक महिन्याला 7,417 रुपये भरावे लागतील. नो-कॉस्ट ईएमआय असल्याने त्यावर तुम्हाला कोणतंही प्रकिया शुल्क किंवा व्याज भरावं लागणार नाही.

लपून-छपून कोण पाहतंय तुमचं Facebook Profile? असं तपासा

Galaxy Z Flip3 5G हा फोन खरेदी करण्याचे दुसरे पर्यायही उपलब्ध आहेत. त्यावर 5% म्हणजेच 4,100 रुपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड हवं. याशिवाय, इतर उपलब्ध असलेल्या प्रीपेड ऑफरसह, तुम्ही कोणत्याही क्रेडिट कार्डने पेमेंट केलं, तर तुम्हाला 7 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. त्यामुळे तुम्हाला हा फोन 77,899 रुपयांना पडेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या