नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : Apple कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर त्याने iPhone संदर्भात काही गोपनीय माहिती समोर (iPhone secret tricks) आणायला सुरूवात केली आहे. त्यामुळं आता Apple कंपनी अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. कॅनेडियन टेक एक्सपर्ट सबरीना बदिन यांनी यासंदर्भात त्यांच्या टिकटॉक प्रोफाइलवर (iPhone shocking information) अनेक Video शेयर केले आहे. सबरीना यांचे टिकटॉकवर 30 हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. Apple Genius च्या रूपात कंपनीच काम केल्यानंतर त्यांची आयफोनबद्दल अनेक सिक्रेट ओपन केले आहे. काय आहेत सिक्रेट? आयफोनमध्ये एकाचवेळी अनेक Apps चा वापर करता येऊ शकतं. त्याचबरोबर एकापेक्षा अधिक Apps ला एकाचवेळी हटवता येतं. अनेक आयफोन्स युजर्सला याबाबतच्या फीचर्सबद्दल (Former Apple employee opens iPhones secret tricks) माहिती नव्हती. त्याचबरोबर आयफोनमध्ये युजर्सला एखाद्या App वर प्रेस करून किंवा त्याला होल्ड करून Moved करता येतं. त्याचबरोबर अशा काही मोजक्या Apps ला होमस्क्रिनवरही आणता येऊ शकतं.
एकाचवेळी एकापेक्षा अधिक मेल किंवा मेसेज निवडा जर युजर्सला आयफोनमधील iMessage किंवा मेलवरील मेसेज हटवायचे असतील तर त्यासाठी प्रत्येक मेसेजला सेलेक्ट करण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त इनबॉक्स ओपन करून स्क्रिनवर प्रेस केल्यानंतर Delete Them ऑप्शनला सेलेक्ट करून ही प्रोसेस पूर्ण करू शकता. त्याचबरोबर युजर्सला Mark Them As Read हा ही पर्याय निवडता येईल.
Video Recording करताना वाजवा संगीत आयफोनमध्ये Video Recording करत असताना Spotify किंवा Apple Music सारख्या App च्या माध्यमातून युजर्सला Video मध्ये गाणी Add करता येणार आहे. त्याचबरोबर कॅमेरा ओपन असतानाही या फीचर्सचा युजर्सला लाभ घेता येईल. त्यामुळं आयफोनवर Video Recording करत असताना गाणं ही सुरू राहिल. असे काही विविध युजर्सला माहिती नसलेले फीचर्स सबरीना यांनी जगासमोर आणले आहेत. त्यामुळं आता Apple ची नाचक्की होण्याची शक्यता आहे.