JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फेसबुकने बदललं डिझाइन, Whatsapp नंतर पहिल्यांदाच दिलं 'हे' फीचर

फेसबुकने बदललं डिझाइन, Whatsapp नंतर पहिल्यांदाच दिलं 'हे' फीचर

जगभरातील युजर्सना नवं डिझाइन स्विच करण्याचा पर्याय दिला जात आहे. याआधी तो ठराविक युजर्सना दिला जात होता.

जाहिरात

एकाच वेळी 50 देशांमध्ये हे बाजारात आणण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ज्यात अमेरिका, भारत, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, यू.के., जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांचा समावेश आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 मे : सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकने त्यांचे नवे डिझाइन लाँच केले आहे. लवकरच युजर्ससाठी नवं डिझाइन उपलब्ध होणार आहे. कंपनीने अॅपसह वेबसाइवरसुद्धा सर्व युजर्ससाठी डिझाइन लाँच केलं. जगभरातील युजर्सना नवं डिझाइन स्विच करण्याचा पर्याय दिला जात आहे. याआधी तो ठराविक युजर्सना दिला जात होता. फेसबुककडून एक ब्लॉग पोस्ट करण्यात आला आहे. यात म्हटलं की, 16 वर्षांपूर्वी फेसबुक लाँच झाल्यानंतर आतापर्यंत बराच बदल झाला आहे. नुकतंच आम्ही मोबाइल फेसबुकवर फोकस केला आहे. यात आम्ही डेस्कटॉप साइटपेक्षा खूप मागे आहे. लोकांना यामध्ये अपडेट हवे होते. आम्ही नवीन फेसबुक डिलिव्हर करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. तुम्ही जर वेब ब्राउजरवर फेसबुक उघडलं नसेल तर तुम्हाला ते पाहता येईल. वेबसाईट ओपन करताच युजर्सना नवीन डिझाइन स्विच करण्याचा पर्याय मिळतो. विशेष म्हणजे तुम्हाला नवीन साइटवरून पुन्हा जुन्या साइटवर जाता येतं. हे वाचा : Work from Home मुळे वाढतोय सायबर क्राइमचा धोका,80%कंपन्या सुरक्षा देण्यास असमर्थ फेसबूकमध्ये नव्या डेस्कटॉप साइटमध्ये क्लीन आणि स्ट्रीमलाइन दिसते. युजर्सना व्हिडिओ, गेम्स आणि ग्रुप्समध्ये स्विच करणं सोपं आहे. तसंच डेस्कटॉप डिझाइन मोबाइल अॅपसारखंच आहे. युजर्सना वेबसाइटवरसुद्धा पहिल्यांदाच डार्क मोड पर्याय देण्यात आला आहे. याआधी व्हॉटसअॅपवर डार्क मोड फीचर देण्यात आलं आहे. नवीन डिझाइनमध्ये फेसबुक पाहण्यासाठी लॉगआऊटसाठी ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा. त्यामध्ये सर्वात शेवटी switch to new facebook असा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करताच नव्या डिझाइनमध्ये तुम्ही फेसबुक वापरू शकता. हे वाचा : Work From Home करणाऱ्यांसाठी Jio चे खास प्लॅन, डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या