शेवटी UPI PIN टाकावा लागेल आणि सेंडवर क्लिक करावं लागेल. अशाप्रकारे विना इंटरनेट UPI Payment करू शकता. हे फीचर केवळ MTNL आणि BSNL युजर्स वापरु शकतात.
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : जर तुम्ही दिवसातील मोठा वेळ Smartphone वर घालवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Google Play Store वर काही असे Apps आहे, जे गेम खेळण्यासाठी पैसे देतात. देशात कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर पैसे कमावण्यासाठी अनेकांनी असे पर्याय शोधले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा नोकरीची गरजच भासली नाही. ऑनलाइन पैसे कमावण्यासाठी अनेक प्रकार आहेत, ज्यात अनेक लोक आपला संपूर्ण खर्च त्या मिळणाऱ्या पैशातून भागवू शकतात. मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळूनही घरबसल्या पैसे कमावू शकतात. यासाठी काही Apps डाउनलोड करावे लागतील.
Online Survey - अनेक कंपन्या सतत सर्व्हे करत असतात. गुगल प्ले स्टोरवर अनेक असे Apps आहेत, जे सर्व्हेच्या बदल्यात युजरला पेमेंट करतात. या सर्व्हेतून दररोज 800 रुपये ते 1500 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. महिन्याला Apps च्या सर्व्हेतून 45 ते 50 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.
Game Test - Google Play Store वर असे अनेक Apps आहेत, जे गेम खेळण्यासाठी पैसे देतात. हे Apps गेम खेळून ते टेस्ट करण्याची संधी देतात. त्यासाठी गेम खेळणाऱ्या व्यक्तीला एक फिक्स्ड अमाउंट दिली जाते. ही अमाउंट Working Hours वर अवलंबून आहे. अधिक गेम खेळल्यास जास्त पैसे आणि कमी खेळल्यास त्या हिशोबाने पैसे मिळतील. या Apps वर गेम खेळून तुम्ही महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये कमावू शकतात.