JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Facebook देतंय कमाईचा गोल्डन चान्स! Reels Videos मधून मिळवता येणार पैसे

Facebook देतंय कमाईचा गोल्डन चान्स! Reels Videos मधून मिळवता येणार पैसे

फेसुबक Reels चे ग्लोबल लाँचिंग झाले आहे. Tiktok प्रमाणेच असणाऱ्या या फीचरमध्ये शॉर्ट व्हिडीओ बनवता येतात. व्हिडीओसह Editing आणि Effects चाही वापर करता येतो. जर तुम्हाला रील्स बनवण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी: जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फेसबुक (Facebook), ट्विटर आणि इन्स्टाग्राम असे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत फेसुबक (Facebook) सर्वाधिक लोकप्रिय आहे. अगदी बॉलिवूड सेलिब्रेटींपासून ते सामान्य नागरिक सर्वंच जण याचा वापर करतात. सध्या फेसुबक हे एक कमाईचं साधन झालं आहे. फेसुबक Reels चे ग्लोबल लाँचिंग झाले आहे. Tiktok प्रमाणेच असणाऱ्या या फीचरमध्ये शॉर्ट व्हिडीओ बनवता येतात. व्हिडीओसह Editing आणि Effects चाही वापर करता येतो. जर तुम्हाला रील्स बनवण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जगभरातील सुमारे 150 देशांमध्ये रील्स बनवले जातात. हे रील्स फिचर अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. फेसबुक रील्स (Facebook Reels) पहिल्यांदा 2020 मध्ये Tiktok सोबतच्या स्पर्धेत लाँच करण्यात आले होते. हे वाचा- Smartphone द्वारे काही सेकंदात चोरी झाले 64 लाख रुपये,वाचा कसा झाला Online Fraud रील्स तयार करणाऱ्यांना कमाईची संधी दिली जाईल, असं मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (META CEO Mark Zuckerberg) यांनी म्हटलं आहे. यासाठी फेसबुक लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. या अंतर्गत आता फेसबुक छोट्या रील्स व्हिडीओंमधून कमाईचा काही भाग रील निर्मात्यांसोबत शेअर करण्याची तयारी दाखवत आहे. येत्या काही आठवड्यांत फेसबुक प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच कंटेंट क्रिएटर्स आता फेसबुकच्या माध्यमातून रील्स बनवून कमाईदेखील करू शकतील. टिकटॉकला जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली असून यामुळे फेसबुकसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी फेसबुकने जगभरातील कंटेट क्रिएटर्संना आपल्या प्लॅटफॉर्मवर आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जाहिरातीमधून येणारी कमाई कंटेट क्रिएटर्सबरोबर शेअर केली जाईल, असं फेसबुकने जाहीर केलं आहे. सर्वप्रथम हा प्रयोग यूएस, कॅनडा आणि मेक्सिकोमधील युजर्संसाठी केला जाईल. त्यांना जाहिरातीमधून मिळणारी कमाई दिली जाईल. तर त्यानंतर येत्या काही आठवड्यांमध्ये इतर देशांमध्ये हे लाँच केले जाईल. भारतामध्येदेखील लवकरच ही योजना लाँच केली जाईल, असं फेसबुकने म्हटलं आहे. भारत ही फेसबुकची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. हे वाचा- आता Facebook देणार TikTok ला टक्कर, आणलं नवं जबरदस्त अपडेट फेसुबकवर सध्या रील्स पाहताना कोणत्याही प्रकारची जाहिरात येत नाही. एकानंतर एक असे युजर्सचे रील्स दिसतात. पण, यामध्ये फेसबुकने बदल केला आहे. फेसबुककडून राबवण्यात येत असलेल्या या प्रयोगामध्ये सहभागी होत असलेल्या युजर्संना दोनपैकी कोणताही एक जाहिरात फॉरमॅट निवडावा लागेल. यातील पहिला फॉरमॅट बॅनरचा आणि दुसरा फॉरमॅट स्टिकर्सचा आहे बॅनर फॉरमॅटमधील जाहिराती फेसबुक रील्सच्या खालच्या भागात पारदर्शक पद्धतीने दिसतील. तर स्टिकर्स मोडमध्ये जाहिरात कोणत्याही स्टिकर्सप्रमाणे रील्सवर दिसतील. याशिवाय, रील्सच्या कोणत्याही भागात कंटेट क्रिएटर्स स्टिकर्स लावू शकतील. या दोन फोटोंमध्ये ते आणखी चांगल्या प्रकारे समजले जाऊ शकते. पहिल्या फोटोत तुम्हाला जाहिरात ही रील्सवर स्टिकर लागलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत रील्सच्या खालच्या भागात जाहिरात दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या