JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Parenting Tips: रात्रीच्या वेळी तुमची मुलं तासनतास इंटरनेटवर काय पाहतात? वेळीच द्या लक्ष, नाहीतर...

Parenting Tips: रात्रीच्या वेळी तुमची मुलं तासनतास इंटरनेटवर काय पाहतात? वेळीच द्या लक्ष, नाहीतर...

Parenting Tips: मुलांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल फोन पाहण्याची सवय वाढत आहे. इंटरनेटच्या युगात अनेक प्रकारची जोखीम आणि त्रुटी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की पालक कोणत्या पद्धतींचा अवलंब करून मुलांसाठी इंटरनेटचे जग सुरक्षित करू शकतात.

जाहिरात

Parenting Tips: रात्रीच्या वेळी तुमची मुलं तासनतास इंटरनेटवर काय पाहतात? वेळीच द्या लक्ष, नाहीतर...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर: कोरोनाच्या काळात ऑनलाइन अभ्यासामुळं मुलांनी मोबाईलचा खूप वापर केला. यादरम्यान मुलांनी केवळ मोबाईल फोनद्वारेच अभ्यास केला नाही तर शाळेतील सर्व उपक्रमही पूर्ण केले. त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल पाहण्याची सवय वाढली आहे. आता ऑफलाइन वर्ग सुरू झाले असले तरी मुलांचे मोबाईलचे व्यसन सुटत नाही. इंटरनेटच्या युगात अनेक प्रकारची जोखीम आणि त्रुटी आहेत. युनिसेफच्या मते, एक तृतीयांश पेक्षा जास्त लहान मुले ऑनलाइन सायबर धमकीचा अनुभव घेत असल्याची तक्रार करतात. याशिवाय, लैंगिक छळ आणि अत्याचाराच्या बातम्यांमध्ये वाढ झाली आहे. वेबकॅम एक्सेस, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि चाइल्ड पोर्नोग्राफीला प्रोत्साहन देणारे प्लॅटफॉर्म हे जगभरातील अनेक पालकांसाठी चिंतेचं कारण आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांसाठी इंटरनेटचं जग  सुरक्षित करू शकतात. 1) मुलांच्या Online Activityचा मागोवा घेणं- इंटरनेटच्या दुनियेत मुलाचा प्रवेश हा एखाद्या कंपनीतील इंटर्नसारखाच असतो. कारण या टप्प्यातील मुलांना त्याची सुरक्षितता आणि त्रुटी समजत नाहीत. त्यांना कालांतरानं इंटरनेटचे फायदे आणि तोटे समजतात. त्यामुळं पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांचा पासवर्ड शेअर करण्याबद्दल सांगू शकतात. यामागचा हेतू त्यांचीच सुरक्षितता आहे.पासवर्डचा वापर करून पालकांना मुलांच्या अॅक्टिव्हिटी, त्यांना काय आवडते, ते काय लाइक, डिसलाइक करतात, हे पाहता येईल आणि येणाऱ्या धोक्यापासून मुलांचं रक्षण करता येईल. हेही वाचा:  Women Health: थकवा-अशक्तपणा घालवण्यासाठी महिलांनी घरच्या-घरी करा हे 5 उपाय 2) पालकांचे नियंत्रण आवश्यक - तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवल्यानं आपोआपच त्यांचा स्क्रीन-टाइम ऑनलाइन नियंत्रित होतो, याशिवाय मूल कोणत्या प्रकारचा कंटेट अ‍ॅक्सेस करत आहेत, हे देखील तपासू शकता. 3) सोशल मीडिया हे धोक्याचे घर- ऑनलाइन बुलिंग ही मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी समस्या बनत आहे. तुमच्या मुलाला या वस्तुस्थितीबद्दल सांगा की जर कोणी त्यांना त्रास देऊन किंवा धमकावून काही करायला लावत असेल तर घाबरण्याची गरज नाही. अशावेळी घाबरण्यापेक्षा पालकांसोबत शेअर करा.

मुलांना नेहमी सांगा की ते जे काही ऑनलाइन दिसतं, ते तसंच असेल असं नाही. त्यामुळे एखादा मुलगा त्याच्या प्रोफाईलवर मुलीचे प्रोफाईल बनवून चॅट करत असण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या