नवी दिल्ली, 10 डिसेंबर : Aadhaar Card प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अतिशय आवश्यक डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड देशात ओळखपत्र म्हणून सर्वात अत्याश्यक कागदपत्र ठरलं आहे. बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि अनेक सरकारीसह खासगी कामांसाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे आधार कार्डमध्ये चूक झाल्यास आपली माहिती नाव, जन्मतारीख, लिंग अशा गोष्टी अपडेट करण्याची परवानगी अथॉरिटी UIDAI कडून दिली जाते. तसंच पत्ता, मोबाइल नंबर आणि ईमेलमध्येही बदल करता येतात. आधार कार्डमध्ये हे सर्व बदल ऑनलाइन https://ssup.uidai.gov.in/web/guest/ssup-home वर क्लिक करुन अपडेट करता येतात. परंतु मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी जवळच्या एनरोलमेंट सेंटरवर जावं लागेल. यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागत नाही.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची रिक्वेस्ट या 7 कारणांमुळे नाकारली जाऊ शकते - - चुकीचा PoA/PoI डॉक्युमेंट - PoA/PoI Self-Attested नसणं - Transliteration अर्थात दुसऱ्या लिपीत लिहिलेली माहिती - ऑनलाइन पोर्टलद्वारे अपलोड केलेल्या मूळ डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी न मिळणं - फॉर्ममध्ये शेअर केलेला मोबाइल आणि आधार नंबर चुकीचा असणं - सपोर्टिंग डॉक्युमेंट नावावर नसणं एकदा माहिती यशस्वीरित्या अपडेट झाल्यानंतर त्यासंदर्भात SMS येईल. https://ssup.uidai.gov.in/web/guest/check-status यावर स्टेटसची माहिती मिळवता येते.
Aadhaar Card पुन्हा मिळवण्याची पद्धत - - UIDAI च्या अधिकृ वेबसाइट uidai.gov.in वर जा. - होमपेजवर आधार सर्विसेज टॅबअंतर्गत My Aadhaar ऑप्शनवर क्लिक करा. - आता Retrieve Lost or Forgotten EID/UID वर क्लिक करा. - आता पर्सनल डिटेल्स रजिस्टर्ड मोबाइल नंबर, नाव आणि ईमेल आयडी टाका. - मोबाइल नंबरवर OTP येईल. तो वेबसाइटवर टाकावा लागेल. - तुम्ही रिक्वेस्ट केलेला UID/EID नंबर मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.