JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Diwali Offer! Apple कडून 18,900 रुपयांचे AirPods फ्री

Diwali Offer! Apple कडून 18,900 रुपयांचे AirPods फ्री

भारतात Apple स्टोरकडून दिवाळी ऑफर अंतर्गत Apple AirPods मोफत देणात येणार आहेत. दिवाळीची ही जबरदस्त ऑफर 17 ऑक्टोबरपासून उपलब्ध आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : Apple कंपनीचा फोन, एयरपॉड्स आणि इतर अनेक गॅजेट्स आपल्याकडे हवेत अशी अनेकांची इच्छा असते. परंतु appleचे प्रोडक्ट्स खरेदी करणं अतिशय महाग असतं. मात्र आता ऍपलने ग्राहकांसाठी खास ऑफर अंतर्गत AirPods मोफत देण्याची घोषणा केली आहे. भारतात Apple स्टोरकडून दिवाळी ऑफर (Diwali Offer) अंतर्गत Apple AirPods मोफत देणात येणार आहेत. दिवाळीची ही जबरदस्त ऑफर 17 ऑक्टोबरपासून उपलब्ध आहे. ग्राहकांनी Apple iPhone 11 खरेदी केल्यास त्यावर Apple AirPods फ्री मिळणार आहेत. ऍपलने काही दिवसांपूर्वी ऍपल स्टोर भारतात लाईव्ह केलं आहे आणि आता दिवाळी ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जर नुकत्याच लॉन्च केलेल्या ऑनलाईन स्टोरमधून आयफोन 11 खरेदी केला, तर त्या खरेदीवर ऍपल एयरपॉड्स फ्री मिळणार आहेत. Appleने आपल्या ऑनलाईन स्टोरच्या होमपेजवर या दिवाळी ऑफरची घोषणा केली आहे. हे वाचा -  महिंद्रा कंपनी या गाडीच्या खरेदीवर ग्राहकांना फ्री देतेय 1 लाखांचा कोरोना विमा Apple AirPods किंमत - ऍपल इंडिया ऑनलाईन स्टोरवर, चार्जिंग केसवाल्या एयरपॉड्सची किंमत 14,900 रुपये आहे. वायरलेस चार्जिंग केसवाल्या एयरपॉड्सची किंमत 18,900 रुपये आहे. तर AirPods Pro साठी 24,900 रुपये भरावे लागणार आहेत. हे वाचा -  आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर! iPhone 11 किंमत - 64GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या iPhone 11च्या बेस वेरिएंटची किंमत 68,300 रुपये आहे. तर 128GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 73,600 रुपये आणि 256GBची किंमत 84,100 रुपये आहे. ईएमआयमध्ये हा फोन 8038 रुपये प्रति महिन्यांतर्गत खरेदी केला जाऊ शकतो. आधीचा स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 5802 रुपये प्रति महिना ईएमआयमध्ये फोन खरेदी करता येऊ शकतो.

हे वाचा -  आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत iPhone 11; कुठे आणि कधी मिळणार पाहा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या