JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Data Hacking in Vi: व्होडाफोन-आयडियाच्या लाखो ग्राहकांचा डेटा चोरीला? सायबर सुरक्षा कंपनीचा दावा

Data Hacking in Vi: व्होडाफोन-आयडियाच्या लाखो ग्राहकांचा डेटा चोरीला? सायबर सुरक्षा कंपनीचा दावा

Data Hacking in Vi: व्होडाफोन-आयडिया या कंपनीच्या ग्राहकांचा डेटा सध्या चोरला गेल्याची चर्चा आहे. Vi च्या तब्बल 301 मिलियन ग्राहकांचा डेटा चोरला गेला आहे.

जाहिरात

Data Hacking in Vi: व्होडाफोन-आयडियाच्या लाखो ग्राहकांचा डेटा चोरीला? सायबर सुरक्षा कंपनीचा दावा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑगस्ट: सायबर सुरक्षा ही अतिशय संवेदनशील गोष्ट आहे. सहज आणि सोप्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे याच माध्यमातून चोरी किवा हॅकिंग करणाऱ्या सायबर चोरांचं प्रमाण वाढतं आहे. डेटा ही सध्याची सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे डेटा हॅकिंग (Data Hacking) करणारे सतत चोरीसाठी प्रयत्नशील असतात. Vi अर्थात व्होडाफोन-आयडिया या कंपनीच्या ग्राहकांचा डेटा सध्या चोरला गेल्याची चर्चा आहे. Vi च्या तब्बल 301 मिलियन ग्राहकांचा डेटा चोरला गेला आहे. त्यामुळे यातून मोठ्या गैरप्रकाराची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात कंपनीकडून अजून अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांकडे ग्राहकांचा महत्त्वाचा डेटा असतो. हा डेटा चोरीला गेल्यास त्याचा वापर अनेक गैरप्रकारांसाठी केला जाऊ शकतो. ही ग्राहकांची फसवणूकच असते. CyberX9 या सायबर सुरक्षा (Cyber Security Firm) कंपनीनं Vi कंपनीवर ग्राहकांचा डेटा खुला केल्याचा आरोप केला आहे. यात 20 मिलियनहून जास्त पोस्टपेड ग्राहकांचा डेटा आहे. एकूण 301 मिलियन ग्राहकांचे फोन नंबर्स, पत्ता, कॉल लॉग, एसएमएस रेकॉर्ड आणि इंटरनेटच्या वापराची माहिती ऑनलाइन पद्धतीने चोरली गेली होती. Vi ने मात्र डेटा चोरीला गेल्याचं वृत्त नंतर फेटाळलं होतं. ही गोष्ट कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीनं लगेचच त्यावर उपाययोजना केल्या असं कंपनीचं म्हणणं आहे. हेही वाचा: कुठे फिरतेय तुमची जवळची व्यक्ती? व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं शोधा Live Location टेलिकॉम कंपनीच्या लाखो ग्राहकांची सुरक्षा आणि गोपनीयता या प्रकारामुळे धोक्यात आल्याचा आरोप CyberX9 या कंपनीनं केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून Vi अशा प्रकारे ग्राहकांचा डेटा खुला करत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. तसंच आता हा डेटा हॅकर्सच्या हातात लागला आहे असंही सायबर सुरक्षा कंपनीला वाटत आहे. मात्र Vi ने या बाबीला अधिकृतरीत्या दुजोरा दिलेला नाही. ग्राहकांचा जो डेटा चोरीला गेला आहे, त्यात ग्राहकांचे फोन नंबर, पत्ता, पूर्ण नाव, पर्यायी मोबाइल नंबर, लोकेशन, बिलबाबतची माहिती, तसंच कुटुंबीयांबाबतची माहितीही समाविष्ट आहे, असं सायबर सुरक्षा कंपनीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मोबाइल नंबर व पत्त्यासारखी महत्त्वाची माहिती हॅकर्सच्या हातात मिळाल्यामुळे आता त्याद्वारे बँक खात्यातून पैसे चोरीला जाणं, खासगी माहितीचा दुरुपयोग होणं हे प्रकार घडू शकतात. चोरीला गेलेल्या डेटामध्ये कंपनीच्या पोस्टपेड ग्राहकांचा डेटाही आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अशा प्रकारच्या डेटा हॅकिंगच्या प्रकरणात ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज असते. आर्थिक माहिती इतरांसोबत शेअर न करणं, पिन नंबर, पासवर्ड इतरांना न देणं या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या