JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; असा बुक करा तुमचा स्लॉट

Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; असा बुक करा तुमचा स्लॉट

कोरोना लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. यासाठी कुठेही न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येतं. रजिस्ट्रेशन रोज सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत करता येतं. मिळणाऱ्या स्लॉटवर लसीकरण उपलब्ध आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 मार्च : देशभरात कोविड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला आहे. यात 60 वर्षांवरील लोक आणि 45 वर्षांहून अधिक वय असणारे लोक, ज्यांना काही आजार आहेत, ते या दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस घेऊ शकतात. कोरोना लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. यासाठी कुठेही न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येतं. लोक कोविन वेबसाईट (CoWIN) किंवा आरोग्य सेतू App द्वारे रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशनसाठी कोणतंही CoWIN App नाही. रजिस्ट्रेशन रोज सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत करता येतं. मिळणाऱ्या स्लॉटवर लसीकरण उपलब्ध आहे. असं करा रजिस्ट्रेशन - - सर्वात आधी www.cowin.gov.in वर लॉगइन करा. - यात आपला फोन नंबर टाका आणि Get OTP वर क्लिक करा. - SMS द्वारे फोन नंबरवर OTP पाठवला जाईल. - OTP टाकून वेरिफाय बटणावर क्लिक करा. - ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर Registration of Vaccination पेज दिसेल. - या पेजवर आवश्यक डिटेल्स भरावे लागतील. फोटो आयडी प्रुफ, फोटो आयडी नंबर, जन्म तारीख, लिंग आणि 45 वर्षांवरील लोकांना त्यांना कोणता आजार आहे, हे सांगावं लागेल.

(वाचा -  तो शेर तर तुम्ही सव्वाशेर! या चुका टाळल्यात, तर कधीच होणार नाही ऑनलाईन फसवणूक )

- डिटेल्स भरल्यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या रजिस्टरवर क्लिक करा. - रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तसा मेसेज येईल. - एकदा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर सिस्टम, अकाउंट डिटेल्स दाखवेल. - पेजच्या उजव्या बाजूला दिलेल्या Add More ऑप्शनवर क्लिक करुन याच मोबाईल नंबरने आणखी तुमच्या कोणत्या लोकांना लस घ्यायची आहे, त्यांना Add करता येईल. व्यक्तीचे डिटेल्स टाकून Add बटनवर क्लिक करावं लागेल. अपॉईंटमेंट शेड्युल करण्यासाठी स्टेप्स - - अपॉईंटमेंट शेड्युल करण्यासाठी अकाउंट डिटेल्स पेजने करू शकतो. त्यासाठी Schedule Appointment वर क्लिक करावं लागेल. - यानंतर Book Appointment for Vaccination पेजवर पोहोचाल.

(वाचा -  …तर नुकसान भरपाईची जबाबदारी बँकेची नाही; कोर्टानंही बँक ग्राहकांना ठणकावलं )

- त्यानंतर ड्रापडाउन केल्यावर राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड टाकावा लागेल. सर्च बटण क्लिक केल्यावर वॅक्सिनेशन सेंटरची यादी दिसेल. - सेंटरचं नाव पेजच्या उजव्या बाजूला दिसेल. - त्यानंतर उपलब्ध स्लॉट (तारीख आणि कॅपेसिटी) दिसेल. - बुकवर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation पेज येईल. - त्यानंतर शेवटी डिटेल्स वेरिफाय करुन कन्फर्म बटणवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या