JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 5G लाँचनंतर 10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

5G लाँचनंतर 10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

एकीकडे देशात 5G लाँच झाल्यामुळं देशात आनंदी वातावरण आहे, त्याचवेळी लोकांच्या मनामध्ये काही प्रश्नही तसेच शंकाही येत आहेत. 5Gआल्यानंतर 10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल काम करणं बंद करतील, अशा बातम्या वेगानं येत आहेत.

जाहिरात

5G लाँचनंतर10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील?वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑक्टोबर: 5G तंत्रज्ञानाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आलं. प्रगती मैदानावर झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशात 5G नेटवर्क लाँच करण्यात आलं. एकीकडे देशात 5G लाँच झाल्यामुळं देशात आनंदी वातावरण आहे, त्याचवेळी लोकांच्या मनामध्ये काही प्रश्नही तसेच शंकाही येत आहेत.आल्यानंतर 10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल काम करणं बंद करतील, अशा बातम्या वेगानं येत आहेत. अशा अनेक मोबाईल कंपन्या आहेत ज्यांनी त्यांच्या फोनवर 5G लिहिणं सुरू केलं आहे, परंतु त्यांचे फोन 5G नेटवर्क चालण्यास सक्षम नाहीत. 5G तंत्रज्ञानामुळं देशातील विविध क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, रोजगार यांवरही 5Gचा परिणाम होणार आहे.  5G नेटवर्क कसं तपासायचं? तुम्ही फोनच्या सेटिंग्ज अॅपवर जा. त्यानंतर वायफाय आणि नेटवर्कवर टॅप करा. नंतर सिम आणि नेटवर्क वर जा. येथे तुम्हाला पसंतीच्या नेटवर्क प्रकारावरील सर्व पर्याय मिळतील. जर तुमच्या फोनला 5G सपोर्ट असेल तर तिथं 2G/3G/4G/5G दर्शवेल.  कंपनीची माहिती द्या- 5G स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे ज्या कंपनीचे सिम आहे, जी 5G नेटवर्क देते किंवा नाही ते तपासा.  5G फोनमध्ये 3G-4Gदेखील चालेल- स्मार्टफोन 5G वर असला तरी 3G-4G सेवा बंद होणार नाही. 5G सोबतच तुमचा स्मार्टफोन 3G आणि 4G ला देखील सपोर्ट करेल.  बँड आणि वारंवारता तपासा- 5G सपोर्टसाठी मोबाईलची वारंवारता 450MHz पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा मोबाइल फोन घेणार असाल, तर 5G बँड तपासण्यासाठी त्याची वेबसाइट सर्वोत्तम आहे. केवळ रिव्यू किंवा इनफ्लूएंसर यांवर अवलंबून राहू नका. वेबसाइटवर फोन मॉडेल निवडा आणि त्याचे तपशील तपासा. फोनच्या नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी पर्यायांवर जा. हेही वाचा:  सावधान! 5Gमुळं तुम्ही कंगाल तर होणार नाही ना? तज्ज्ञांनी दिला सावधतेचा इशारा, वाचा कारण 3-4 बँड आवश्यक- भारतात 5G (5G Bands) इंटरनेट सपोर्ट फोनमध्ये 3 ते 4 बँड असणं आवश्यक आहे. फोनमध्ये किती 5G बँड आहेत याची माहिती देखील रिटेल बॉक्स देखील देतो. रेडिओ इंफॉर्मेशन बॉक्समध्ये तुम्हाला NR म्हणजे नवीन रेडिओ किंवा SA/NSA जर 5G बँड लिहिले असेल तर तुम्हाला तेथे 5G सक्षम सपोर्टबद्दल माहिती मिळू शकेल.

 100 च्या आसपास 5G मोबाईल फोन उपलब्ध: देशात जवळपास 100 5G मोबाईल फोन लॉन्च करण्यात आले आहेत. या यादीमध्ये OnePlus, Samsung, TCL, Xiaomi, Huawei, Oppo, Nokia (Oneplus, Samsung, TCL, Xiaomi, Huawei, Oppo, Nokia) समाविष्ट आहे. Samsung Galaxy M33, Redmi Note 11T5G, Redmi 5G 9A Sport, Samsung Galaxy M32 शेकडो Oppo Reno 5, Oppo Reno 8, Motorola 5G, Samsung Galaxy M13 यासह 5G मोबाईल फोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या