JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / बाबो! या घडाळ्याच्या किंमतीत गाडी घेऊ शकाल, कार कंपनी Buggati चं Smartwatch लाँच

बाबो! या घडाळ्याच्या किंमतीत गाडी घेऊ शकाल, कार कंपनी Buggati चं Smartwatch लाँच

स्मार्टवॉचद्वारे युजरला आपल्या हार्ट रेटमध्ये काही बदल झाला असल्यास त्याची माहिती तत्काळ मिळू शकते. युजर आपला हार्ट रेट मॉनिटर करू शकतो. या स्मार्टवॉचच्या माध्यमातून युजरला झोपेचा दर्जा, हालचाली आणि कॅलरीज याची माहितीही मिळू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 मे : सध्या बाजारात अनेक फीचर्सचा समावेश असलेली स्मार्टवॉचेस उपलब्ध आहेत. हार्ट रेट, ऑक्सिजन रेट, व्यायाम, झोपेचा कालावधी, कॉल, मेसेज नोटिफिकेशन आदींबाबतची माहिती युजरला या स्मार्टवॉचच्या माध्यमातून मिळते. अधिक फीचर्सचा समावेश असलेल्या स्मार्टवॉचला ग्राहकांकडून चांगली मागणी असते. स्मार्टवॉचेस निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये आता अजून एक नव्या कंपनीची भर पडली आहे. बुगाटी (Bugatti) ही प्रख्यात वाहन उत्पादक कंपनी आपल्या व्हेरॉन (Veyron) आणि चिरॉन (Chiron) या शानदार कार मॉडेल्ससाठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादन सेगमेंटमध्ये (Electronic Segment)उतरली आहे. या कंपनीने स्मार्टवॉच (Smartwatch) सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. या कंपनीने बुगाटी क्रिमीक्यू one pour Sport, बुगाटी क्रिमीक्यू One Le Noire आणि बुगाटी क्रिमीक्यू One Divo अशी स्मार्टवॉचेसची तीन मॉडेल्स लाँच केली आहेत. या स्मार्टवॉचेसच्या माध्यमातून युजरला त्याचा हार्ट रेट समजू शकतो, तसंच कॉल-मेसेज नोटिफिकेशनदेखील (Call-Message Notification) मिळू शकतात.

(वाचा -  दारू पिऊन गाडी चालवणं दूरच,आता ती स्टार्टच होणार नाही;विद्यार्थ्याने शोधला मार्ग )

काय आहेत फीचर्स - बुगाटी या कंपनीने आपल्या तीनही स्मार्टवॉचेसचे फीचर्स बऱ्यापैकी सारखेच ठेवले आहेत. परंतु, कंपनीने या तीनही स्मार्टवॉचेसचं डिझाइन वेगवेगळं ठेवलं आहे. कंपनीने या स्मार्टवॉचेमध्ये राउंड AMOLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचं रिझोल्यूशन 390*390 असं आहे. या तीनही स्मार्ट वॉचेमध्ये दमदार 445mAhची बॅटरी दिली आहे. हे वॉच एकदा चार्ज केल्यानंतर 14 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टवॉचला सिलिकॉन आणि टायटेनियमचा स्ट्रॅप देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये ड्युअल सेन्सर्स दिले आहेत. यामुळे युजरला आपल्या हार्ट रेटमध्ये काही बदल झाला असल्यास त्याची माहिती तत्काळ मिळू शकते. युजर आपला हार्ट रेट मॉनिटर (Heart Rate Monitor)करू शकतो. या स्मार्टवॉचच्या माध्यमातून युजरला झोपेचा दर्जा, हालचाली आणि कॅलरीज याची माहितीही मिळू शकते.

(वाचा -  Digital India चं नवं चॅलेंज, या स्पर्धेत भाग घेऊन 5 लाख रुपये जिंकण्याची संधी )

या तिन्ही स्मार्टवॉचमध्ये 90 स्पोर्ट्स मोड देण्यात आला आहे. यामुळे युजरला हेल्थ ट्रॅकिंगसह कॉल, मेसेजेसचं नोटिफिकेशनदेखील मिळणार आहे. या व्यतिरिक्त युजर आपला आरोग्यविषयक डेटा या स्मार्टवॉचच्या माध्यमातून रेकॉर्डदेखील करू शकतो. कंपनीने ही तीनही स्मार्टवॉचेस iOS 13.0 आणि अँड्रॉइड 7.0 या ऑपरेटिंग सिस्टमसाठी कम्पॅटिबल बनवली आहेत. या स्मार्टवॉचेसची किंमत 899 युरो म्हणजे भारतीय चलनानुसार 79 हजार 400 रुपये एवढी आहे. या स्मार्टवॉचेसचं आगाऊ बुकिंग सुरू झालं आहे, मात्र भारतात ही स्मार्टवॉचेस नेमकी केव्हा उपलब्ध होणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या